Truck crashes into 150 feet deep valley, incident in Satyagrahi Ghat | १५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक, सत्याग्रही घाटातील घटना 

१५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक, सत्याग्रही घाटातील घटना 

तळेगांव (शा.पं.) (वर्धा) :  राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटातील वळणावर २२ एप्रिलच्या रात्री १.३० वाजताच्या सुमारास ड्रायव्हरला झोपेची डुलकी आल्याने  ट्रक दरीत १५० फूट कोसळला. सुदैवाने या अपघातात जीवीत हानी झाली नाही, परंतु चालक व त्याचा सहकारी  जखमी झाले आहे. 

भंडारा येथून राजकोटला जी.जे.०३ बी. व्ही.३६९९ क्रमांकाचा ट्रक  रात्री १.३० वाजताच्या सुमारास सत्याग्रही घाटातुन लोखंडी रॉड घेऊन जात होता. तेव्हा चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रकचे संतुलन बिघडून ट्रक सत्याग्रही घाटातील वळणावरील  १५० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक महम्मद तय्युम सलामुद्दीन रा रीवा. मध्यप्रदेश व त्याचा सहकारी हे दोघेजण जखमी झाले. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पवण भांबुरकर, पोलीस शिपाई संजय शिंगणे, रोशन करलुके, देवेंद्र गुजर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना आर्वी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास तळेगांव पोलीस करीत आहे.

Web Title: Truck crashes into 150 feet deep valley, incident in Satyagrahi Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.