शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
2
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
5
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
6
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
7
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
8
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
9
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
10
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
11
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
12
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
13
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
14
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
15
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
16
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
17
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
18
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
19
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
20
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षी कारभारामुळे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: February 27, 2017 00:33 IST

शहरातील बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे.

बजाज चौकातील प्रकार : वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज; नागरिकांना सहन करावा लागतो नाहक त्रास वर्धा : शहरातील बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. याच चौकात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याकडून कामात कुचराई केल्या जात असल्याने या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. रविवारी दुपारी येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. जवळपास १ तास परिश्रम केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वरिष्ठांनी योग्य दखल घेण्याची गरज आहे. शहरात वाढलेल्या वाहनांची संख्या व छोट्या-मोठ्या वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यासाठी शासनाचा मोठा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करू असे लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात असले तरी हे काम कासव गतीनेच सुरू असल्याची ओरड आहे. उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून संबंधीतांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्यावर कृती करणे क्रमप्राप्त होते. परंतु, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात आले नसल्याचा प्रत्यय रविवारी दुपारी बघावयास मिळाला. रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास बजाज चौकात नेहमीप्रमानेच वाहतुकीची कोंडी झाली होती. परिणामी, यवतमाळकडून वर्धेत, हिंगणघाटकडून वर्धेत तर वर्धेतून हिंगणघाट व यवतमाळकडे जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. बजाज चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. यावर मार्ग काढण्याकरिता प्रशासनाच्यावतीने अरूंद असलेल्या उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलत प्रभावी कार्यवाही करणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी) मनमर्जीने केली जातात वाहने उभी स्थानिक बजाज चौकात पालिका प्रशासनाच्यावतीने वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असली या परिसरात ठिकठिकाणी मनमर्जीने वाहने उभी केली जात आहेत. बजाज चौकातील काही परिसरात आॅटो स्टॅन्डची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, बरेच आॅटोचालक इतरांची पर्वा न करता आपल्या ताब्यातील वाहन रस्त्यावरच उभे करून आॅटोत प्रवासी बसवतात. हा प्रकार अपघाताला निमंत्रण देणारा असून याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. कर्तव्यावरील अनेक वाहतूक पोलीस चहा व पानटपरीवरच अर्धा अधिक वेळ घालवताना दिसत असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. बजाज चौकात मुख्य भाजी बाजार असून भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. यातच रविवार असल्याने येथे होणारी गर्दी अधिक असते. सध्या बजाज चौकात वर्धा न. प. प्रशासनाने पे अ‍ॅन्ड पार्कची व्यवस्था केली आहे. मात्र, त्याचा वापर होत नसल्याचे येथे उभ्या असलेल्या वाहनांवरून दिसत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. येथील बजाज चौक परिसरात आॅटोचालक व इतर वाहनचालक आपल्या ताब्यातील वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करतात. हा प्रकार मोठ्या अपघाता निमंत्रण देणारा ठरत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी, संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांसह वाहनचालकांच्या या समस्येकडे लक्ष देणे आता गरजेचे आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून बजाज चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक आॅटोचालक व इतर वाहनचालक वाहतूक नियमांना येथे दररोज फाटाच देत असल्याचे बघावयास मिळते. त्यांच्या या अनागोंदी कारभाराकडे वाहतूक पोलिसही कानाडोळाच करीत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहे.