शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाधनगृह दोन वर्षांपासून कुलूपबंद

By admin | Updated: June 23, 2017 01:33 IST

येथील बसस्थानकावर प्रवाशांकरिता दोन वर्षांपूर्वी प्रसाधनगृह बांधण्यात आले. मात्र येथील प्रसाधनगृह कायम बंद असते.

बसस्थानकातील प्रकार : आठ दिवसांत लोकार्पण न झाल्यास आंदोलनाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील बसस्थानकावर प्रवाशांकरिता दोन वर्षांपूर्वी प्रसाधनगृह बांधण्यात आले. मात्र येथील प्रसाधनगृह कायम बंद असते. त्यामुळे प्रवाशांना कुचंबना सहन करावी लागते. येथील प्रसाधनगृहाचे आठ दिवसात लोकार्पण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने निवेदनातून देण्यात आला. या मागणीचे निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आले. येथील प्रसाधनगृहाचे बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्ष झाले. लोकार्पण झाले नसल्याने सदर प्रसाधनगृह कुलूप बंद असते. त्यामुळे महिला प्रवाशांना कुचंबना सहन करावी लागते. राज्य परिवहन महामंडळ अधिकाऱ्यांच्या ही बाब अनेकदा लक्षात आणून दिली. मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवासी, विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत असतात. त्यांना नाईलाजास्तव नैसर्गिक विधी उघड्यावर उरकावे लागतात. मात्र याचे कुणालाच सोयरसुतक नसल्याचे निवेदनात नमुद केले आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेता येथील प्रसाधनगृह तातडीने नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याची मागणी शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष शुभम लुंगे, उपाध्यक्ष कुणाल चोरे, सचिव सुरज खोडके, सहसचिव आकाश देवतारे, किशोर बावने, सुनिल घंगारे, गुड्डू गुजर, प्रविण झाडे, महेश भानारकर, पुष्कर मुरेकर, गुड्डू घंगारे, समीर डाखोळे, आरिफ झिरिया, विक्की पारधी, रोशन चोरे, मयुर सावरकर, संजय खोडके, अजित, समीर, पंकज भानारकर, सिध्दांत खोडके, शुभम डहाके, पंकज निमजे आदींनी बंद प्रसाधनगृहाच्या दाराला हार घालून निषेध नोंदविला. बसस्थानक व्यवस्थापकांना निवेदन देत कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. प्रसाधनगृहाला हार घालून केला निषेधतालुकास्थळाच्या बसस्थानकावरील प्रसाधनगृहाचे लोकार्पण न करता कुलूपबंद ठेवण्यात आले आहे. या प्रकारामागचे रहस्य अद्याप कुणाला कळलेले नाही. प्रसाधनगृह कुलूपबंद असल्याने महिलांची कुचंबना होत आहे. बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वारंवार मागणी करुनही प्रसाधनगृहाचे कुलूप उघडले जात नसल्याने नागरिकांनी आक्रमक झाले आहेत.