शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

टिसी व नोंदवहीत सुधारणांचे आदेश

By admin | Updated: October 14, 2016 02:42 IST

विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दिल्या जाणाऱ्या दाखल्यावर शाळांना आता आधार क्रमांक टाकावा लागणार आहे.

शासनाचा आदेश : नव्या निर्णयानुसार कारवाईच्या सूचनापुरुषोत्तम नागपुरे  आर्वीविद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दिल्या जाणाऱ्या दाखल्यावर शाळांना आता आधार क्रमांक टाकावा लागणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार शासनादेश शाळांना निर्गमित करण्यात आले आहेत. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवणी यात सुधारणा करण्याचे आदेश आहेत.शासन निर्णयानुसार सदर आदेश २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवही नमुन्यात ही माहिती आॅनलाईन भरणे. सर्वच शाळांना अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांचे आयडी युडीआय क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, पूर्वीच्या शाळेत कोणत्या इयत्तेपासून शिक्षण घेत असल्याची माहिती नवीन प्रपत्रात समाविष्ट केला जाणार आहे. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक प्रमाणभूत व महत्त्वाचे दस्तावेज आहे. विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणे जातीचा दाखल व पासपापेर्ट बनविणे व इतर बाबींसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र म्हणजे विद्यार्थ्यांची शाळेची परिपूर्ण ओळखच असते.सध्या माध्यमिक शाळा नियम क्रमांक १० व परिशिष्ट ८ मध्ये शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या नमुना दिला आहे. परिशिष्ट १८ मध्ये सर्वसाधारण नोंदवहीचा नमुना दिलेल्या आहे. असे असले तरी शाळांमधून शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो; मात्र, दाखल्याचा एकच नमुना असावा, अशी मागणी जिल्हा माध्यमिक शाळा, शिक्षकेत्तर, कर्मचारी संघटनेची होती. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा दाखल एकसारखाच एकाच नमुन्यात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा प्रशासनाने या आदेशाची दखल घेत शाळेतील विद्यार्थ्याची आधारकार्ड नोदणी व सरल आधारित सर्व प्रकारची माहिती संकलन पूर्वतयारी म्हणून शैक्षणिक सत्र २०१६-१७ करीता नोंदी करण्यासाठी करावेत, असे आवाहन जिल्हा माध्यमिक शाळा, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने केले आहे.