शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेवर चालणार अपंगांची तीन चाकी सायकल

By admin | Updated: October 14, 2015 02:08 IST

तंत्रज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचणार नाही, समाजहिताचे संशोधन होत नाही, तोपर्यंत डिजिटल इंडियाची संकल्पना पुर्णत्वास येऊ शकत नाही.

बा.दे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले तंत्रज्ञानवर्धा : तंत्रज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचणार नाही, समाजहिताचे संशोधन होत नाही, तोपर्यंत डिजिटल इंडियाची संकल्पना पुर्णत्वास येऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेत सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महा.च्या मेकॅनिकल इंजि. शाखेतील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी अपंगांची तीन चाकी सायकल विकसित केली आहे.प्रचलित तीन चाकी सायकल ही एका हातात हॅण्डल तर दुसऱ्या हाताने पॅडल मारून चालवावी लागते. पायाने चालता येत नाही व हाताने पॅडल मारल्याने वेदना होतात. खांद्यालाही दुखणे येते, अशी अपंगांची व्यथा आहे. याचा अभ्यास करून सायकल विकसित करण्याची कल्पना सुचली. सद्यस्थितीत असलेल्या सायकलमध्ये काय सुधारणा करता येईल, याबाबत एक डिझाईन तयार केले. अभ्यासांती सायकल बनविण्यास प्रारंभ केला. मोटरसायकल प्रमाणे हॅण्डल बसविले. यात एका हातात ब्रेक तर दुसऱ्या हातात एक्सलेटर देण्यात आले. सोबतच लाईटची सुविधा देण्यात आली. मागील भागात ५२ ए.एच. ची डिसी मोटर बसविण्यात आली. वर बसविलेल्या सौर ऊर्जा प्रणालीने बॅटरी चार्जींग होत राहील. बॅटरी सुस्थितीत राहावी म्हणून चार्ज कंट्रोलर लावण्यात आले. बॅटरी डिसचार्ज वा ओवरचार्ज होणार नाही. सूर्यप्रकाश असला तर सायकल कितीही तास चालू शकेल; पण सूर्यप्रकाश नसल्यास किमान तीन तास चालेल एवढी बॅटरी चार्ज राहील व ४० किमीपर्यंत सायकल सहजरित्या चालेल. ही सायकल अपंगांना उपयोगी ठरेल.(कार्यालय प्रतिनिधी)अपंगांकरिता वरदानसदर सायकलची २० किमी प्रती तास एवढी वेगमर्यादा बांधण्यात आली आहे. अपंग व्यक्तींना सहज सुलभ व्हावे, अशी सायकलची निर्मिती आहे. उन्ह, पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून छत आहे. अपंगांना सहज बसता येईल, अशी बैठकव्यवस्था आहे. अपंगांच्या सूचना लक्षात घेत प्रात्यक्षिकासह सायकलला अंतीम रूप देण्यात आले. सदर सायकल प्रा. आर.जे. डहाके प्रकल्प मार्गदर्शनात अभिजीत कडू, अनूप पहाडे, गणेश शिद, गौरव मोरे, हर्षल झाडे, एन. इंगोले, निखिल वानखेडे व परेश राऊत या विद्यार्थ्यांनी विकसित केली आहे. ही सायकल अपंगांना वरदान ठरणार आहे.