शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

महावितरणचे कर्मचारी बुधवारी परतल्यावर त्यातील सात कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर चौघांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे. हे कोरोना बाधित कर्मचारी, आंजी (मोठी), पिपरी (मेघे) आणि वर्धा येथील समतानगर येथील रहिवासी आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ज्या ठिकाणी रुग्ण आढळला तो परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरुग्ण संख्या २३ वर। सावंगी (मेघे), आंजी (मो.), पिपरी (मेघे)चा बहुतांश भाग सील

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणात वीज दुरूस्तीच्या कामासाठी गेलेल्या २० पैकी ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शहरालगतच्या सावंगी (मेघे) ग्रा.पं.च्या हद्दीतील समतानगर, आंजी (मोठी) व पिपरी (मेघे) येथील काही भाग सील करण्यात आला आहे. शनिवारी जिल्ह्यात एकाच दिवशी तीन रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता २३ झाली आहे.महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची संसर्ग झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. या तिन्ही कोरोनाबाधितांवर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.महावितरणचे कर्मचारी बुधवारी परतल्यावर त्यातील सात कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर चौघांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे. हे कोरोना बाधित कर्मचारी, आंजी (मोठी), पिपरी (मेघे) आणि वर्धा येथील समतानगर येथील रहिवासी आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ज्या ठिकाणी रुग्ण आढळला तो परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे.तीन वाहनांनी परतले २० व्यक्तीतीन वाहनांनी हे २० कर्मचारी कोकणातून वर्धा जिल्ह्यात परतले. सात कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून उर्वरित १३ कर्मचाऱ्यांचे स्वॅब शनिवारी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर ज्या वाहनाने हे कर्मचारी वर्ध्यात आले त्या वाहनाच्या तिन्ही चालकांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. शिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कात कुणी व्यक्ती आलेत काय याचा शोध सध्या महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे अधिकारी घेत आहेत.आंजीत दोन दिवस बाजारपेठ बंदआंजी येथील वॉर्ड क्र. १ मधील रहिवासी आणि खरांगणाच्या महावितरणच्या कार्यालयात कार्यरत कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याने आंजी येथे खळबळ उडाली आहे. सदर वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच लागण झालेल्या इसमाच्या पत्नी व मुलीला तपासणीसाठी सावंगी येथे नेण्यात आले. शिवाय त्यांचे स्वॅब घेण्यात आले. सकाळी वर्धेच्या तहसीलदार प्रिती डुडुलकर, गटविकास अधिकारी स्वाती इसाये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी बोरकर, बांधकाम विभागाचे अभियंता संजय मंत्री, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सरपंच जगदीश संचेरिया, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेजा काळे, ग्रामविकास अधिकारी सुधाकर आसुटकर, उपसरपंच दिलीप रघाटाटे, तलाठी खामलकर, सुनील गफाट यांनी आंजी (मोठी) गाठून पाहणी केली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या