वर्धा : मार्शल पेट्रोलिंग करीत असताना वाहन चालकास हटकल्यावरून झालेल्या वादात पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन धमकावले. ही घटना शांतीनगर परिसरात रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रानुसार, शहरात विविध भागात मार्शल व विविध चमूच्या माध्यमातून पेट्रोलिंग सुरू असते. या अंतर्गत मुख्यालयाचे पोलीस कर्मचारी नीलेशसिंग सूर्यवंशी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, सिंदी (मेघे) परिसरात आकाश नेहाते व बंडू नेहाते या दोघांना त्यांना अडवून शिवीगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिली. या प्रकरणी सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून या दोघांवर कलम ३५३, २९४, ५०६, १८६ अन्वये गुन्हा दाखल केला.(स्थानिक प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}