घर झालं भस्मसात, शॉर्टसर्किटने लागली आग, दोन गोठेही जळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 14:26 IST2022-05-01T14:25:44+5:302022-05-01T14:26:40+5:30

Fire Case : बेढोना  येथील शेतकरी  प्रकाश साठे, प्रशांत सरोदे यांचा गोठा जळून शेती साहित्याचे मोठे नुकसान झाले.

The house was burnt down, a short circuit caused a fire and two cowsheds were also burnt | घर झालं भस्मसात, शॉर्टसर्किटने लागली आग, दोन गोठेही जळाले

घर झालं भस्मसात, शॉर्टसर्किटने लागली आग, दोन गोठेही जळाले

वर्धा : आर्वी तालुक्यातील बेढोना येथे शॉर्टसर्किटने आग लागून दोन गोठे शेती साहित्य व घर  भस्मसात झाल्याची घटना  घडली. बेढोना  येथील शेतकरी  प्रकाश साठे, प्रशांत सरोदे यांचा गोठा जळून शेती साहित्याचे मोठे नुकसान झाले.

तर गजानन देहारे यांचे घर जळून भस्मसात झाले दोन्ही गोठ्याचे ८० हजाराचे तर घराचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी असा अंदाज आहे.

Web Title: The house was burnt down, a short circuit caused a fire and two cowsheds were also burnt