शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

"शिवसेनेचा अंत जवळ आलाय", नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 16:57 IST

महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी) वर्धा येथे आयोजित सेवाग्राम औद्योगिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

वर्धा - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मोठे योगदान राहिले असून ग्रामीण स्वयंरोजगाच्या माध्यमातून आर्थिक संमृद्धीलाही चालना दिली. त्याचे हेच विचार घेवून वर्ध्यामध्ये ग्रामीण औद्योगिक प्रगतीचे लक्ष्य आहे. यासाठीच महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्थेच्या परिसरात महात्मा गांधींचे स्मारक उभारुन औद्यागिकीकरणाची माहिती आणि प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली. नारायण राणेंनी या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. तसेच, शिवसेनेचा अंत जवळ आलाय, असं भाकीतही त्यांनी केलं. 

महात्मा गांधी औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी) वर्धा येथे आयोजित सेवाग्राम औद्योगिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आपसात कॉर्डीनेट साधत आहे. परंतु यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कॉर्डीनेट नसून त्यांना कॉर्डिनेटची गरजच नाही. दसऱ्याच्या दिवशी कळेल आणि त्याच दिवशी त्यांचं पितळ उघड पडेल. शिवसेना तरी अस्तित्वात आहे का? उरलेले आमदारसुद्धा पक्ष सोडून जातील, असे राणेंनी यावेळी म्हटले.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी स्वतः मला मुख्यमंत्री केलं, तेव्हाही उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे लायक नाहीत. त्यांना महाराष्ट्राबद्दल काही जाण नाही. हिंदुत्वाशी गद्दारी करून ते निवडून आले आहेत, भारतीय जनता पक्षाशी बरोबरी करून मोदींच्या नावाने मत मागून निवडून आले आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी त्याग केला असेही ते म्हणाले. बाळासाहेब जिवंत असते तर उध्दव ठाकरे कधीही मुख्यमंत्री झाले नसते.  शिंदे गट बरेचशे धक्के शिवसेनेला देत आहे, आता फक्त मला एवढीच काळजी आहे की या धक्क्यांना उद्धव ठाकरे नीट सांभाळून घेतील का, हाच प्रश्न आहे. शिवसेनेचा अंतजवळ आला आहे, असे भाकीतच केंद्रीय मंत्री राणे यांनी केले. 

३८ एकर परिसरात महात्मा गांधींचे स्मारक

महात्मा गांधींच्या स्मारक निर्मितीकरिता येत्या सहा महिन्यामध्ये समितीचे गठण करुन येत्या अडीच वर्षात या ३८ एकराच्या परिसरात स्मारक पूर्णत्वास जाईल. या स्मारकाच्या माध्यमातून युवा पिढीला गांधींजींच्या ग्रामीण औाद्योगिक प्रगतीसंदर्भातील माहिती, प्रशिक्षण दिली जाईल. येथे येणाºया प्रत्येक पर्यटकांना एक वेगळी अनुभूती या स्मारकातून होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एमगिरीतील संचालकाचे पद रिक्त असून ऐत्या एक ते दीड महिन्यात हे पद भरले जाणार असून विदर्भातील व्यक्तीची नियुक्ती केली जाईल, असेही ना. राणे म्हणाले.  यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भानुप्रतापसिंह वर्मा, सूक्ष्म मंत्रालयाचे सचिव बी.बी.स्वैन, सहसचिन आणि अधिकारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे wardha-acवर्धाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे