हिंदी विद्यापीठात उच्च शिक्षणातील संधींबाबत चर्चा

By Admin | Updated: June 4, 2014 23:57 IST2014-06-04T23:57:58+5:302014-06-04T23:57:58+5:30

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात उच्च शिक्षणातील आव्हाने आणि संधी या विषयावर वर्धेतील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत बैठक घेण्यात आली.

Talk about high educational opportunities in Hindi University | हिंदी विद्यापीठात उच्च शिक्षणातील संधींबाबत चर्चा

हिंदी विद्यापीठात उच्च शिक्षणातील संधींबाबत चर्चा

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात उच्च शिक्षणातील आव्हाने आणि संधी या विषयावर वर्धेतील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत बैठक घेण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. गिरीश्‍वर मिश्र होते. यावेळी ते म्हणाले. विद्यार्थ्यांना रोजगारप्राधान अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांशी सहकार्य स्थापन करुन विद्यापीठाने अनेक योजना हाती घेतल्या आहे. विद्यापीठ हे भाषा आणि संस्कृतीचे आंदोलन असून ते समाजामध्ये नेण्यासाठी वर्धेतील महाविद्यालयांची मदत घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
या बैठकीला बी. डी. इंजिनियरींग काँलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. गायकवाड, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालयाचे एस. जी. धवड, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाचे डॉ. धनंजय सोनटक्के, डॉ. प्रतिभा ताकसांडे, राष्ट्रसंत माध्यमिक महाविद्यालयाचे पी. बी. गुल्हाने, जयश्री पतकी, डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद सवई, अनुप कुमार, लोक महाविद्यालयाच्या डॉ. पुष्पा तायडे, जानकीदेवी बजाज कॉलेज ऑफ सायंसचे डॉ. ओम महोदय, डॉ.आर. जी. भोयर इंस्टिट्युट ऑफ फार्मसीचे एस. डी. बुटे, यशवंत महाविद्यालयाचे डॉ.विलास देशमुख, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. कैलास बिसांद्रे आदी प्राचार्य प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा. मिश्र यांनी विद्यापीठाच्या विविध योजनांची माहिती दिली. ‘सक्षम’ नामक स्पेल चेकर, वर्धा हिंदी शब्दकोष, समाज विज्ञान विश्‍वकोष, हिंदी समय डॉटकॉम तसेच बहुवचन, पुस्तकवार्ता आणि हिंदी या महत्वाच्या नियतकालिकांविषयी त्यांनी उपस्थित प्राचार्यांना अवगत केले.  सध्याचे युग तंत्रज्ञानावर निर्भर असल्याने या विषयींचे अभ्यासक्रम आखण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कुलसचिव प्रा. देवराज यांनी प्रास्ताविक केले. सर्व प्राचार्यांनी आपले मत व्यक्त केले. डॉ. अमित विश्‍वास आणि नौशाद यांनी अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली. संचालन विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रा. अनिल कुमार राय यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी बी.एस.मिरगे यांनी मानले.
(शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Talk about high educational opportunities in Hindi University