शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय कार्यालयासमोर धरणे

By admin | Updated: August 7, 2015 02:03 IST

येथील वणा नदी पाणी बचाओ संघर्ष समितीच्यावतीने वर्धेच्या कंपनीला येथून पाणी घेण्यासाठी विरोध दर्शविण्याकरिता गुरुवारी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

हिंगणघाट : येथील वणा नदी पाणी बचाओ संघर्ष समितीच्यावतीने वर्धेच्या कंपनीला येथून पाणी घेण्यासाठी विरोध दर्शविण्याकरिता गुरुवारी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. याच वेळी पत्रकार परिषद घेण्यात घेत उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगांवकर यांना विरोधाचे निवेदन सोपविण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे प्रा. दिवाकर गमे, मनोज रूपारेल, संतोष तिमांडे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता धर्मराज रेवतकर, सुनील राऊत, सुरेश सातोकर, नरेंद्र चुंबळे, प्रविण उपासे, सौरभ तिमांडे, राकेश शर्मा, रूपेश लाजुरकर, केशव तितरे, भारत पवार, सुभाष धोटे, पुंडलीक बकाने, कमलाकर बोकडे, विजय एनपुतवार, विजय गुप्ता, प्रमोद जुमडे, नरेंद्र पांढरे, महेश खडसे, प्रदीप महल्ले, किशोर पांडे, अनिल हटवार, मिलिंद कोटेकार, विजय धोटवत, घनश्याम झिले, शंकर मुंजेवार, उमेश झोटींग, महीपाल रामटेके आदी उपस्थित होते. यावेळी धर्मराज रेवतकर, प्रा. दिवाकर गमे, संतोष तिमांडे, राकेश शर्मा यांनी वणा नदी पाणी बचाव संघर्ष समितीची भूमिका विषद केली. या प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांना दबावाखाली आणून वायगाव पासून पाईप टाकण्याचे काम सुरूच असल्याचे सांगितले. येथून ४५ कि.मी वरील या कंपनीला हिंगणघाटच्या वणा नदीतून उद्योगासाठी पाणी देवू नये म्हणून गत चार महिन्यापासून येथे जनआंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात अनेक निवेदने देण्यात आली, तरीही या कंपनीकडून पाईप लाईन टाकण्याचे काम सुरूच आहे. येथील वणा नदी पात्रातून ८.७३ दहा लक्ष घन मिटर पाणी उचल करण्याची परवानगी जलसंपदा मंत्रालयाच्या एका पत्रान्वये २६ फेब्रुवारी २०१० ला देण्यात आली. त्यावेळी या कंपनीने या संबंधीच्या अटी व शर्तीनुसार तीन महिन्याच्या आत संबंधीतांशी करारनामा केला नाही. पाच वर्षानंतर या कंपनीने हिंगणघाट ते भुगाव पर्यंतच्या एक मिटर व्यासाची पाईप लाईन टाकण्याच्या कामाला प्रारंभ करताच सदर आंदोलन करण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)