शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

पाईकमारी येथील शिधा वाटप केंद्रचालकावर कार्यवाही करा

By admin | Updated: May 27, 2016 01:57 IST

तालुक्यातील पाईकमारी येथे शिधा वाटप केंद्र आहे. या कोंचालकाकडून मनमानी व आर्थिक लुट होत असल्याचा आरोप नागरिकांचा असून चौकशीची मागणी

संतप्त नागरिकांचे तहसीलदारांना साकडेसमुद्रपूर : तालुक्यातील पाईकमारी येथे शिधा वाटप केंद्र आहे. या कोंचालकाकडून मनमानी व आर्थिक लुट होत असल्याचा आरोप नागरिकांचा असून चौकशीची मागणी पाईकमारी येथील संतप्त नागरिकांची आहे. या प्रकरणी त्यांनी तहसीलदार सचिन यादव यांना निवेदन सादर केले आहे. पाईकमारी येथे छाया गाठे यांच्याकडे शासकीय शिधा वाटप केंद्र आहे. सदर केंद्र नियमितपणे सुरू न ठेवता महिन्यातून फक्त दोन दिवसच ते उघडले जाते. त्यामुळे अनेक नागरिक शिधा वाटपापासून वंचित राहतात. ज्यांना धान्य मिळते त्यांच्याकडून अधिकचे पैसे घेवून आर्थिक लुट केल्या जाते. उरलेले धान्य केंद्रचालक काळ्या बाजारात अवैधपणे विकतो, असा आरोप नागरिकांनी निवेदनातून केला आहे. प्रत्येक शिधा केंद्र चालकाने शासनाच्या निर्देशाप्रमाणे दुकानाच्या दर्शनी भागावर ठळकपणे दिसेल असे फलक लावणे बंधनकारक आहे. या फलकावर दुकानाचे व दुकानदाराचे नाव कामाच्या वेळा, सुटीचे दिवस प्रत्येक दिवसाची होणारी आवक खप, शिल्लक साठा व किरकोळ विक्रीचे दर आदिंचा समावेश असने गरजेचे आहे. शिधा वस्तुचे वितरण शासनाच्या निरनिराळ्या अन्न योजना इत्यादीच्या लाभार्थीची यादी नागरिकांच्या छाननी करिता उपलब्ध करणे, इत्यादीची माहिती निरीक्षक समिती व यादी एकाच फलकावर दर्शविणे आवश्यक आहे.या शिधा केंद्रचालकाकडून अशा कोणत्याही नियमाचे व निर्देशांचे बंधन पाळण्यात येत नाही. उलट मनमानी अवैध वसुली व लुट सुरू असल्याचे पाईकमारी गावच्या नागरिकांनी सांगितले. तक्रार वही ठेवणे व ती शिधाधारकांना उपलब्ध करून देणे आवश्यक व बंधनकारक असताना सुद्धा केंद्रचालकाने तशी कुठल्याही प्रकारची वही ठेवलेली नाही. धान्य दिल्यानंतर त्याच्या दराची व पूर्ण किंमतीची पावती देणे बंधनकारक असताना तशी कुठलीही पावती येथून दिल्या जात नसल्याचा आरोप आहे. सदर शिधा केंद्रचालकांची शासनाने योग्य व गंभीर दखल घेवून केंद्राची चौकशी करून योग्य न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी पाईकमारी गावातील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी मुकेश बाभुळकर, गजानन सुकळकर, रामदास बाभुळकर, विठ्ठल चावरे, दादा धोबे, रेखा शेंडे, विनोद मसराम, वैशाली चापरे, कविता राऊत, प्रमोद राऊत, चेतना गुरनुले, भाऊराव घुडे, वृषभ राऊत यांच्यसह गावातील नागरिकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)