शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पांजरा गोंडी जंगलात संशयास्पद मृतदेह

By admin | Updated: August 14, 2015 02:18 IST

खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्य पांजरा (गोंडी) शिवारात गुरूवारी पुरुषाचा मृतदेह आढळला.

आकोली : खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्य पांजरा (गोंडी) शिवारात गुरूवारी पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो चार पाच दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करणे गरजेचे असताना तसे झाले नाही. याचा त्रास पोलिसांना तपासात होणार असल्याचे बोलले जात आहे. पोलीस सुत्रानुसार, पांजरा (गोंडी) शिवारात एक मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. यावरून घटनास्थळी जात पाहणी केली असता तो एका पुरूषाचा असल्याचे निदर्शनास आले. मृतकाचे वय अंदाजे ५० वर्षे असावे असा अंदाज पोलिसांचा आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना ४-५ दिवसांपूर्वीची असावी असा संशय आहे. या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय व सेवाग्रामच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते; मात्र दोनही रुग्णालयाचे अधिकारी आले नसल्याने अखेर पोलिसांनी तो मृतदेह सेवाग्राम रुग्णालयात नेला. ठाणेदार प्रशांत पांडे मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काय ते शवविच्छेदनानंतर काय ते सत्य समोर येईल.(वार्ताहर)