शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
3
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
4
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
5
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
6
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
7
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
8
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
9
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
10
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
11
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
12
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
13
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
14
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
15
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
16
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
17
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
18
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
19
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
20
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
Daily Top 2Weekly Top 5

सुनील टालाटुलेच्या संपत्तीचा लिलाव होणारच

By admin | Updated: April 10, 2016 02:23 IST

जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बहुचर्चित सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारपेठ, सेलू अंतर्गत ४०० कापूस ...

किसान अधिकार अभियानची पत्रकार परिषदेत माहिती
वर्धा : जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बहुचर्चित सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारपेठ, सेलू अंतर्गत ४०० कापूस उत्पादकांचे पैसे श्रीकृष्ण जिनींग व प्रेसींगचा मालक सुनील प्रभाकर टालाटुले याने बुडविले. या विरोधात दिल्लीपासून नागपूर आणि वर्धेत आंदोलने झाली. यामुळे शासनाने त्याच्या स्थावर व जंगम संपत्तीचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी शासनाच्या या आदेशाविरोधात स्थगनादेश आणण्याचा काहींचा प्रयत्न होता. मात्र आता हा लिलाव जमीन महसुलाच्या वसुली पद्धतीनुसार ११ व १२ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती सेलूचे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी दिल्याचे किसान अधिकार अभियानचे मुख्यप्रेरक अविनाश काकडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
या लिलाव प्रक्रियेतून शेतकऱ्यांचे ८ कोटी रुपये वसूल झाले नाही तर शासनाने या रक्कमेची व्यवस्था करावी. अन्यथा शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागेल. याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असेही ते यावेळी म्हणाले. यासंदर्भात सोमवारी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू येथे सर्व संबंधीत शेतकऱ्यांची सभा आयोजित आहे. शेतकऱ्यांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन नागपूर येथील राष्ट्रीय प्रभारी किसान व शेतमजूर कॉँग्रेसचे काकडे, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे यांनी केले आहे. यावेळी सुदाम पवार, प्रा. नूतन माळवी, रामनारायन पाठक, मोहन सोनूरकर, मनोज शिंदे, प्रमोद तडस, मंगेश ढोणे, अ‍ॅड. अनिता ठाकरे, सविता घोडे, अरूण येळणे उपस्थित होते.(प्रतिनिधी)