शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

सणाच्या दिवसांत स्वस्त धान्य दुकानातून साखर बेपत्ता

By admin | Updated: November 2, 2016 00:37 IST

दिवाळीनिमित्त प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ तयार केले जातात. समाजातील दुर्बल घटकांचीही दिवाळी चांगली व्हावी

गरजवंतांची भटकंती : काळ्या बाजाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष वर्धा : दिवाळीनिमित्त प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ तयार केले जातात. समाजातील दुर्बल घटकांचीही दिवाळी चांगली व्हावी म्हणून शासनाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत साखरेचा वेळीच पुरवठा करण्यात आला; पण प्राप्त झालेली साखर अनेक गरजवंतांना मिळाली नसल्याची ओरड होत असल्याने दिवाळीच्या दिवसांमध्ये शासकीय धान्यासह साखरेचा काळाबाजार करणारी टोळी सक्रीय असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील ८३८ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या गरजुंंना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात धान्यसाठा व साखर दिली जाते. गत १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यासाठी १० हजार ९०१ क्विंटल साखर साठा प्राप्त झाला. दिवाळीच्या पूर्वी प्राप्त झालेला धान्य व साखर साठा स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचविण्यात आला; पण गरिबांच्या वाट्याची साखर अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी गरजुंना वाटप न करताच ती चढ्या भावात व्यापाऱ्यांना विकल्याची ओरड होत आहे. दिवाळीच्या पूर्वी मिळणारी साखरच दुर्बल घटकांना मिळाली नसल्याने त्यांना सणाच्या दिवसांत गोड पदार्थांपासून मुकावे लागले. यामुळे जिल्ह्यात होत असलेला साखरेचा काळा बाजार थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.(शहर प्रतिनिधी) जिल्ह्यात ९२ हजार लाभार्थीदारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रती महिना स्वस्त धान्य दुकानातून ५०० ग्रॅम साखर दिली जाते. स्वस्त धान्य दुकानातून सवलतीच्या दरात साखर प्राप्त करणाऱ्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील ४७ हजार ५७४ तर अंत्योदय योजनेच्या ४४,२४० लाभार्थ्यांचा समावेश आहे.जिल्ह्याला १,०२५ क्विंटल साखर प्राप्तयंदा जानेवारी महिन्यात जिल्ह्याला १०२५ क्विंटल साखर प्राप्त झाली असून ती स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोहोचविण्यात आली. फेब्रुवारीत १०२५ क्विंटल साखर उपलब्ध होती. त्यापैकी १०२४.८५ क्विंटल साखरेची उचल करून वाटप करण्यात आली. मार्च, एप्रिल व मे महिन्यात प्रती महिना १०२५ क्विंटल साखर प्राप्त झाली व ती वाटप करण्यात आली. जून महिन्यात १०२५ पैकी १०२४.९२ क्विंटल साखरेची उचल करून वाटप करण्यात आली. जुलै महिन्यात १०२५ पैकी १०२४ क्विंटल, आॅगस्ट महिन्यात १०२५ पैकी १०२४.३१ क्विंटल साखरेची उचल करून वाटप करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात १३५३ क्विंटल साखरचे वितरण करण्यात आले. आॅक्टोबर महिन्यात १३५१.७०४ क्विंटल साखर प्राप्त झाली असून त्याचा वाटप झाल्याचे सांगण्यात आले आहे.