शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सुधाकर घोडेचे आजीवन सभासदत्व रद्द

By admin | Updated: August 24, 2014 23:41 IST

सरस्वती माता शिक्षण प्रसारक मंडळ, ठाणेगावचे सचिव सुधाकर घोडेच्या मनमानी धोरणाविरुद्ध संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सन २००८ मध्ये सेक्शन ४१-डी महाराष्ट्र पब्लीक ट्रस्ट

कारंजा (घा.): सरस्वती माता शिक्षण प्रसारक मंडळ, ठाणेगावचे सचिव सुधाकर घोडेच्या मनमानी धोरणाविरुद्ध संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सन २००८ मध्ये सेक्शन ४१-डी महाराष्ट्र पब्लीक ट्रस्ट कायद्याअंतर्गत धर्मदाय सहआयुक्त नागपूर यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर शहानिशा करून धर्मदाय सहआयुक्त ए. पी. मेते यांनी घोडेच्या विरोधात निकाल देत संस्थेतील मुळ सभासदत्व रद्द केले. निकालामुळे घोडेच्या प्रशासकीय अधिकारावर गंडातर आले आहे.यापुर्वी सुद्धा एका निर्णयाद्वारे घोडेच्या सचिवपदाचे अधिकार रद्द करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर घोडेने सादर केलेला संस्थेचा चेंज रिपोर्टसुद्धा, धर्मदाय उपआयुक्त वर्धा यांनी १४ आॅक्टोबर २०१३ ला नामंजुर केलेला आहे. अर्जदार तुकाराम गाखरे, तुकाराम डोंगरे यांनी गैरअर्जदार सुधाकर घोडे विरुद्ध सेक्शन ४१-डी अंतर्गत, धर्मदाय सहआयुक्त नागपूर यांच्याकडे विनंती अर्ज करून मुळ सभासद क्र.रद्द करण्याची मागणी केली होती. यावेळी घोडेवर आठ गंभीर आरोप केले होते.सन २००३ पासून घोडेने सक्षम अधिकाऱ्याकडे संस्थेचे लेखा परीक्षण अहवाल सादर केला नाही. शिष्यवृत्ती उचलून विद्यार्थ्यांना वाटप केली नाही. व्यायामशाळा बांधकामाकरिता शासनाच्या मिळालेल्या अनुदानाचा गैरवापर केला. रूपाली घोडे यांना शाळा समितीचा ठराव न घेता नियुक्तीचा आदेश दिला. कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम २ लाख ७२ हजार ५२० रुपये शासनाकडे वेळेच्या आत ‘न’ भरता गैरवापर केला. सक्षम अधिकाऱ्याची परवानगी ‘न’ घेता संस्थेची जागा दुसऱ्या संस्थेला दिली अशा प्रकारचे गंभीर आरोप, तक्रारी मध्ये करण्यात आले होते. यातील आठ पैकी सहा आरोप सिद्ध झाल्यामुळे सहआयुक्तांनी सुधाकर घोडे यांचे मूळ सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय दिला. (तालुका प्रतिनिधी)