शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीत अडकला विद्यार्थ्यांचा पोषण आहार

By admin | Updated: September 4, 2015 02:03 IST

शासनाकडून साहित्य पुरविण्यात आले नसल्याने गत दोन महिन्यांपासून राज्यभरातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळाला नाही.

दोन महिन्यांपासून साहित्य नाही : शिक्षकांना तात्पुरती व्यवस्था करण्याच्या सूचना रूपेश खैरी  वर्धाशासनाकडून साहित्य पुरविण्यात आले नसल्याने गत दोन महिन्यांपासून राज्यभरातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळाला नाही. हे साहित्य पुरविण्याकरिता असलेल्या कंत्राटदाराला अद्याप परवानगी नसल्याने ही अवस्था झाल्याचे पुढे आले आहे. शाळेतील चिमुकल्यांवर आहारापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये, याकरिता वर्धेत जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी शिक्षकांना त्यांच्या स्तरावर पोषण आहाराची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या आहेत.जिल्हा परिषद शाळेची घटती पटसंख्या व गावातील स्थितीवर मार्ग काढण्याकरिता शासनाच्यावतीने शालेय पोषण आहार योजना अंमलात आणली. ही योजना अंमलात आली त्या काळापासून ती वादाचीच अधिक ठरल्याचे समोर आले आहे. कधी शाळांना मिळणाऱ्या तांदळाचा दर्जा तर कधी इतर साहित्याचा असलेला तुटवडा यामुळे सदैव चर्चा झाली. आता साहित्य पुरविण्याकरिता असलेल्या कंत्राटदाराच्या पुरवानगीचा मुद्दा समोर आला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आहाराचे साहित्य पुरविल्या गेले नसल्याने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अद्यापपर्यंत पोषण आहार योजना बंदच असल्याचे दिसून आले आहे.उपलब्ध होते नव्हते साहित्य संपले जिल्ह्यात १,२५५ शाळा शासनाच्यावतीने पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहाराच्या साहित्याचे वाटप जिल्हा परिषद, नगर परिषद व अनुदिानित खासगी शाळांना पुरविण्यात येते. जिल्ह्यात अशा एकूण १ हजार २५५ शाळा आहेत. यात शालेय पोषण आहार आला नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. रोख किंवा उधारीवर तांदूळ खरेदीच्या सूचना शासनाच्यावतीने शालेय पोषण आहार पुरविण्यास अडचणी निर्माण होत असल्याने शिक्षकांनी त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत; मात्र गत वर्षापासून शिक्षकांच्या वेतनात नियमितता नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती ढासळल्याचे बोलले जात आहे. शिक्षकांनी त्यांच्या संबंधातील व्यवसायिकाकडून रोख अथवा उधारीत तांदूळ खरेदीच्या सूचना सीईओंनी दिल्या आहेत. शालेय पोषण आहार योजना राबविण्याकरिता शासनाच्यावतीने साहित्य पुरविले जात आहे. यात बऱ्याच शाळांत विद्यार्थी संख्या कमी अधिक होत असल्याने काही प्रमाणात साहित्य शिल्लक राहते. यामुळे शिक्षकांकडून त्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात आला. आज शाळेतील शिल्लक साहित्य पुर्णत: संपले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता आहार कसा द्यावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.