शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

४५६ गावांनी ‘लम्पी’ला दिला सिमेवर थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 5:00 AM

‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजारामुळे गोपालकांच्या अडचणीत भर पडली आहे. असे असले तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून ‘गोट फॉक्स’ ही लस गाय वर्गीय जनारांना दिली जात आहे. ज्या गावात लम्पी बाधित जनावर आढळले त्या गावाच्या ५ किमीच्या त्रिज्येत येत असलेल्या गावातील जनावरांना सध्या प्राधान्यक्रमाने लस दिली जात आहे.

ठळक मुद्दे३७९ गावांत आढळली ७,०३६ बाधित जनावरे : तीन दिवसांच्या उपचाराने जनावर होतेय बरे

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात एकूण ८५३ गावे असल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे आहे. यापैकी ३७९ गावांत आतापर्यंत ‘लम्पी स्कीन डिसीज’चा संसर्ग झालेली ७ हजार ३६ गाय वर्गीय जनावरे आढळली आहेत. वेळीच औषधोपचार मिळाल्याने त्यापैकी ६ हजार ५५२ जनावरे रोगमुक्त झाली असून सध्या ४८४ अ‍ॅक्टिव्ह जनावरे आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील ४५६ गावांनी गोवंशावर ओढावलेल्या ‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजाराला गावाच्या सिमेवरच थांबा दिल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे.‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजारामुळे गोपालकांच्या अडचणीत भर पडली आहे. असे असले तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून ‘गोट फॉक्स’ ही लस गाय वर्गीय जनारांना दिली जात आहे. ज्या गावात लम्पी बाधित जनावर आढळले त्या गावाच्या ५ किमीच्या त्रिज्येत येत असलेल्या गावातील जनावरांना सध्या प्राधान्यक्रमाने लस दिली जात आहे. बाधित गावांच्या त्रित्येत ३५८ गावांचा समावेश असून तेथे एकूण ७७ हजार ३८२ गाय वर्गीय जनावरे आहेत. याच जनावरांना प्राधान्यक्रमाने रोगप्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. ‘लम्पी स्कीन डिसीज’ला वेळीच अटकाव घालण्यासाठी सध्या जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी गोट फॉक्स या लसीचे ८३ हजार ३०० डोजही उपलब्ध झाले असल्याचे सांगण्यात आले.‘लम्पी स्कीन डिसीज’चा प्रसार होऊ नये म्हणून सध्या जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेसाठी मुबलक लस सध्या उपलब्ध आहे. शिवाय आतापर्यंत ३८ हजार ७०० गाय वर्गीय जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. गोपलकांनीही स्वत: पुढे येत आपल्या गाय वर्गीय जनावराला शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन गोट फॉक्स ही लस द्यावी.- डॉ. प्रज्ञा गुल्हाणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, वर्धा.‘गोट फॉक्स’च्या ८३,३०० लस‘लम्पी स्कीन डिसीज’ला वेळीच अटकाव घालण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेसाठी गोट फॉक्स या प्रतिबंधात्मक औषधाची राज्य शासनाकडून १५ हजार ८००, बजाज फाऊंडेशनकडून २० हजार लस उपलब्ध झाली आहे. तर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने ४७ हजार ५०० लस खरेदी केली आहे. एकूणच सध्या प्रतिबंधात्मक लस मुबलक प्रमाणात आहे.५० हजार लसीची केली मागणी‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजाराची जिल्ह्यातील स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शासनाकडे ५० हजार लसीची मागणी नोंदविली आहे. शासनाकडून वेळीच लसही उपलब्ध होईल अशी आशा जिल्हा पशुसंवर्धन विभागाला आहे.४४,५०० गोवंशांना दिली लसमागील आठ दिवसांच्या काळात पशुसंवर्धन विभागाने विशेष मोहीम राबवून ‘लम्पी स्कीन डिसीज’ला वेळीच अटकाव घालण्यासाठी उपयुक्त ठरणारी गोट फॉक्स ही लस जिल्ह्यातील ४४ हजार ५०० गोवंशांना दिली आहे. आणखी काही दिवस ही विशेष लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे.२०८ मनुष्यबळ राबतेयजिल्ह्याला लम्पीमुक्त करण्यासाठी सध्या विशेष लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्याच्या यशस्वीतेकरिता चार सहाय्यक उपायुक्त, २९ पशुधन विकास अधिकारी, ७७ पशुधन पर्यवेक्षक, दहा पट्टीबंधक, ८८ परिचर सेवा देत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्य