शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-भुसावळ प्रवासी रेल्वेगाडी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:42 IST

नागपूर-भूसावळ प्रवासी रेल्वे गाडी बंद करण्यात आल्याने गरीब प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही रेल्वे गाडी तातडीने सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेसची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-भूसावळ प्रवासी रेल्वे गाडी बंद करण्यात आल्याने गरीब प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही रेल्वे गाडी तातडीने सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी केले.धरणे आंदोलनादरम्यान जोरदार नारेबाजी करून शासनाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्विकारले. बंद करण्यात आलेली नागपूर-भूसावळ पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्यात यावी. पेट्रोल, डिझेल व सिलेंडर यांची झालेली भाववाढ तातडीने मागे घेण्यात यावी. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात जाचक ठरत असलेली सिव्हीलची अट रद्द करून त्वरीत कर्ज पुरवठा करण्यात यावा. सरसकट संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली चाराटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात याव्यात. पीक विम्यातील घोळाची चौकशी करून संबंधित कंपन्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचे नुकसान टाळण्याकरिता वनविभागाने योग्य पावले उचलावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. शिवाय येत्या १५ दिवसात या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.