शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पीडगन’ने रोखला ९८२ वाहनांचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत असले तरी काही चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघाताच्या घटना घडतात. यावर प्रतिबंधासह दोषी वाहनचालकांवर कारवाई व्हावी, यासाठी ‘स्पीडगन’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मागील दोन महिन्यांपूर्वीच ‘स्पीडगन’ कार वाहतूक विभागात दाखल झाली आहे. भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या ९३४ वाहनधालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देब्लॅक फिल्म, विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांच्याही आवळल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी पोलीस दलातील वाहतूक विभागात अत्याधुनिक ‘स्पीडगन’ वाहन दाखल झाले असून, या एका वाहनांमध्ये फिक्स टेबल अटॅच विथ स्पीड गन मशीन, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह मशीन आणि जीपीआरएस कनेक्टिव्हिटीची व्यवस्था देण्यात आली आहे. या अत्याधुनिक व्यवस्थेमुळे मागील दोन महिन्यांत ‘स्पीडगन’ वाहनाने तब्बल ९८२ वाहनांवर कारवाई करीत त्यांना ऑनलाईन नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहे.अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत असले तरी काही चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघाताच्या घटना घडतात. यावर प्रतिबंधासह दोषी वाहनचालकांवर कारवाई व्हावी, यासाठी ‘स्पीडगन’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मागील दोन महिन्यांपूर्वीच ‘स्पीडगन’ कार वाहतूक विभागात दाखल झाली आहे. भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या ९३४ वाहनधालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या ४४ वाहनचालकांवर तर चारचाकीला ब्लॅकफ्लिम लागून असलेल्या ६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ महामार्गावर वापरण्यात येणारी हायस्पीडगन कार शहरातील वाहतूक पोलिसांना देण्यात आल्याने बेशिस्त वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. काही वाहनचालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालक वाहने चालवित असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. या घटना टाळण्यासाठी आणि वाहनचालकांमध्ये जागृती करण्यासाठी वाहतूक शाखेकडून प्रयत्न होताना दिसते. काही प्रमाणात का होईना पण; वाढते अपघात टाळण्यास ‘स्पीडगन’ ची मदत होणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस