शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महाराजस्व अभियांनांतर्गत समाधान शिबिर

By admin | Updated: September 20, 2015 02:40 IST

महाराजस्व अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्वरित अंमलबजावणीसाठी पाच टप्प्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

पंकज भोयर यांची माहिती : तालुक्यात पाच टप्पे होणारसेलू : महाराजस्व अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्वरित अंमलबजावणीसाठी पाच टप्प्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. २ आॅक्टोबर रोजी घोराड येथे शिबिर घेण्यात येणार असल्याचे आ.डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. विश्राम गृहात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली. शेतकरी शेतमजुरांच्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानात नागरिकांचे समाधान होणार आहे. नवीन शिधापत्रिका, नावे कमी-चढविणे, दुय्यम शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आपसी वाटणीपत्र, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप आदी योजनांच्या लाभासाठी २५ सप्टेंबरपर्यंत तलाठी व तहसील कार्यालयात अर्ज करावयाचे आहे. ज्यांनी अर्ज केले, त्यांना २ आॅक्टोबरला घोराड येथे होणाऱ्या समाधान शिबिरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. शिबिरांसाठी घोराड, सुरगाव, सेलू, बेलगाव, सुकळी स्टे., जयपूर, महाबळा या महसूल सांझाची निवड करण्यात आली आहे. घोराडनंतर केळझर, हिंगणी, येळाकेळी व झडशी येथे शिबिर घेण्यात येणार आहे. २३ रोजी अपंगांना शासकीय अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी वीर भगतसिंह ग्रामीण विकास बहु. संस्थेद्वारे ग्रामीण रुग्णालयात शिबिर घेण्यात येत आहे. जिल्ह्यात २९ हजार ५८६ अपंग व्यक्ती असून ४ हजार ५०० व्यक्तींनाच प्रमाणपत्र मिळाले. उर्वरित २५ हजार अपंग प्रमाणपत्रविना असून त्यांना न्याय मिळेल.(शहर प्रतिनिधी)