शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

विजेवरील पथदिव्यांजवळ लावले सौर उज्रेचे दिवे

By admin | Updated: May 15, 2014 23:49 IST

शासनाची कुठलीही योजना राबविताना त्यात गैरप्रकार कसा करता येईल, याचे प्रयत्न अधिकारी व लोकप्रतिनिधी करताना दिसतात. असाच प्रकार सध्या स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये उघड झाला आहे.

सुधीर खडसे -समुद्रपूर

शासनाची कुठलीही योजना राबविताना त्यात गैरप्रकार कसा करता येईल, याचे प्रयत्न अधिकारी व लोकप्रतिनिधी करताना दिसतात. असाच प्रकार सध्या स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये उघड झाला आहे. सौर उज्रेवरील दिव्यांची खरेदी ग्रा.पं. द्वारे करण्यात आली; पण गरज नसलेल्या ठिकाणी हे दिवे लावून शासनाचा पैसा व्यर्थ करण्यात आला. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.

तालुक्याचे ठिकाण असलेल्या या ग्रामपंचायतीने १0 ऑक्टोबर २0१२ आणि ६ नोव्हेंबर २0१२ रोजी ५ नग सौर उज्रेवर चालणारे पथदिवे खरेदी केले. यासाठी १ लाख ७९ हजार ५00 रुपये खरेदी करण्यात आले. हे महागडे दिवे गावात आवश्यक ठिकाणी लावले जातील, असे अपेक्षित होते; पण असे झाले नाही. सुमारे पावणे दोन लाख रुपये खर्च करून खरेदी केलेले सौर उज्रेवरील दिवे जेथे गरज नाही, अशा ठिकाणी लावण्यात आले. ग्रा.पं. पदाधिकार्‍यांच्या घरावजळ आधीच विजेवर चालणारे पथदिवे आहेत. या पथदिव्यांच्या शेजारील परिसरात सौर उज्रेवरील महागडे बल्ब बसविण्यात आलेत. यापैकी एक सौर उज्रेवरील दिवा स्मशानभूमीत लावण्यात आला. हा दिवा गत तीन महिन्यांपासून बंद पडलेला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्यात; पण तो दिवाही दुरूस्त करण्यात आलेला नाही.

सौर उज्रेवरील पथदिव्यांच्या खरेदीचा माजी सरपंच जयश्री धोटे यांनी सरपंच असताना विरोध केला होता. शिवाय ग्रामसभेनेही या खरेदीला विरोध दर्शविला होता. कमिशनच्या लोभापायी काही राजकीय नेत्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी ही खरेदी करण्यात आली. शिवाय ग्रा.पं. मध्ये असलेल्या या नेत्यांचे हितसंबंध व संख्याबळ अधिक असल्याने ग्रा.पं. च्या आर्थिक परिस्थितीची तमा न बाळगता सौर उज्रेवरील दिव्यांची खरेदी करण्यात आली. या व्यवहारावरही ग्रामस्थ तसेच ग्रा.पं. सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. सौर उज्रेवरील दिव्यांच्या खरेदीची तसेच ते कुठे व कोणत्या कारणातून लावण्यात आलेत, याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.