बँकेत खातेधारकाकडून सोशल डिस्टन्सिंगला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:46+5:30

बँकेतील खातेधारकांकडून या आदेशाला हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र बँकेसमोर पहावयास मिळत आहे. सकाळी बँक उघडण्यापूर्वीच ग्राहकांच्या लाबलचक रांगा पहावयास मिळत आहे. बँक व्यवस्थापनाकडून वारंवार सूचना देऊनही ग्राहक याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आरोग्याला धोका संभावण्याची भीती आहे.

Social Distance from Bank Account Holder | बँकेत खातेधारकाकडून सोशल डिस्टन्सिंगला ठेंगा

बँकेत खातेधारकाकडून सोशल डिस्टन्सिंगला ठेंगा

ठळक मुद्देरोज लागतात रांगा : ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन, आजाराचा बळावतोय धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असतानाचा बँकेतील खातेधारकांकडून या आदेशाला हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र बँकेसमोर पहावयास मिळत आहे. सकाळी बँक उघडण्यापूर्वीच ग्राहकांच्या लाबलचक रांगा पहावयास मिळत आहे. बँक व्यवस्थापनाकडून वारंवार सूचना देऊनही ग्राहक याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आरोग्याला धोका संभावण्याची भीती आहे.
आर्वी शहरातील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक कृषी शाखा आदी बँकेत ग्राहकांची सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून येते. याठिकाणी स्वयंसेवक, पोलीस किंवा गृहरक्षकांची कमतरता जाणवत आहे. गर्दी टाळणे हाच कोराना आजारासाठी उपाय असून याकडेच दुर्लक्ष केले जात असल्याने या गर्दीतून आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारला बँका उघडण्यापूर्वीच बँकांसमारे अर्ध्या किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. बँक सुरु होताच ग्राहकांनी बँकांमध्ये एकच गर्दी केली त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला. सोशल डिस्टन्स राखण्यासाठी उपाययोजना केली असूनही प्रशासनाचे सर्व नियम, जमावबंदी, कोरोना संबंधीचे सर्व नियम, धाब्यावर बसून नागरिक गर्दी करीत आहे. अशा गंभीर परिस्थितीत शासनाचे निर्देश नागरिकांकडून पाळणे अत्यंत गरजेचे आहे परंतु, नागरिकांच्या असहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असून प्रशासनाने सक्तीचे पावले उचलणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Social Distance from Bank Account Holder