शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार चौकातील सहा दुकाने फोडली

By admin | Updated: August 14, 2015 02:19 IST

स्थानिक आठवडी बाजार चौक तसेच ठाकरे मार्केट परिसरातील सहा दुकाने बुधवारी रात्री फोडण्यात आली.

४० हजार रोख व साहित्य लंपास : व्यापारी वर्गात चोरट्यांची दहशतदेवळी : स्थानिक आठवडी बाजार चौक तसेच ठाकरे मार्केट परिसरातील सहा दुकाने बुधवारी रात्री फोडण्यात आली. यामध्ये औषधीची तीन दुकाने, डेली निड्स, रेडिमेट व जनरल स्टोअर्स आदींचा समावेश आहे. संततधार पावसामुळे सुनसान झालेल्या वातावरणाचा फायदा घेवून मध्यरात्रीच्या दरम्यान या चोऱ्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या दुकानांमधून एकूण ४० हजारांची रोख व काही साहित्य लंपास करण्यात आले आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्ग धास्तावला आहे. पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला काही अंतरावर या चोऱ्या झाल्याने यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे.दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने रात्री ८ वाजताच्या दरम्यान गावातील सर्व रस्ते सुनसान होत आहे. या संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी बाजार मार्केट मधील अजय देशमुख यांच्या मालकीचे दत्तकृपा मेडिकल, विजय टावरी यांचे विजय मेडिकल, संजय कनेर यांचे संजय मेडिकल, वामन शिल्पे यांचे लोकेश डेली निडस, धनराज घुबडे यांचे भास्कर रेडिमेड, बाबा उमरे यांचे श्रीनाथ जनरल स्टोअर्स आदी दुकाने फोडण्यात आली. कुलूपांच्या कोंड्याना लोखंडी रॉडच्या माध्यमातून तडकवून या चोऱ्या करण्यात आल्या. पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेले दिनेश वैद्य यांचे मोबाईलचे दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. एकाच रात्री सहा ते सात दुकाने फोडल्याची ही पहिली घटना आहे. काही दिवसापूर्वी वस्ती परिसरात ३ ते ४ चोऱ्या होवून रोख रक्कम लंपास करण्यात आली. बोपापूर (दिघी) येथील महिलेला तिच्या राहते घरी भरदुपारी लुटण्यात आले. या सर्व घटनांचा तपास थंडबस्त्यात आहे.(प्रतिनिधी)पोलीस गस्त नाहीरात्रीच्या वेळेला पोलिसांची गस्त कमी झाली आहे. एखाद वेळेस काहीतरी पोलीस गाडी फिरवून वेळ मारून नेली जात आहे. दिवसेंदिवस वाढत्या चोऱ्या पोलिसांसाठी आव्हान ठरल्या आहे.औद्योगिक वसाहतीमुळे या भागात बाहेरील लोकांचा भरणा आहे. या सर्वांची माहिती पोलीस ठाण्यात असणे गरजेचे आहे.