शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात ‘सन्नाटा’; रस्त्यांवर बेफिक्रे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या एकीकडे वाढत चालली असताना आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व उपाययोजनांबाबत सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. वर्धा जिल्ह्यात आजवर एकही बाधित किंवा संशयित रुग्ण आढळलेला नाही.

ठळक मुद्देकोरोना व्हायरस : शासकीय कार्यालयातही शुकशुकाट, पानटपऱ्यांचे शटर डाऊन; काळजी घेणारे नगण्यच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव अथवा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी प्रशासनासोबतच आता नागरिकही काही प्रमाणात काळजी घेऊ लागले आहेत. मात्र, त्यांची संख्या अत्यंत नगण्यच राहिली आहे. गुरुवारी वर्धा शहरात ठिकठिकाणी पाहणी केली असता, संमिश्र चित्र दिसले. शासकीय कार्यालयांत गर्दीला बऱ्यापैकी ओहोटी दिसली. मात्र, अन्य सार्वजनिक ठिकाणची गर्दी अजूनही ओसरलेली दिसत नाही. विशेष म्हणजे, स्वत:ची कोणतीही काळजी न घेता हे नागरिक घोळक्याने गप्पा मारताना, हस्तांदोलन करताना, सर्रास रस्त्यावरच थुंकताना आढळून आले.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या एकीकडे वाढत चालली असताना आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व उपाययोजनांबाबत सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. वर्धा जिल्ह्यात आजवर एकही बाधित किंवा संशयित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, यामुळे बेफिकीर राहणे परवडणारे नाही, अशाच पद्धतीने प्रशासनाच्या हालचाली सुरू आहे. प्रचंड सतर्कता या आजाराच्या अनुषंगाने बाळगली जात असतानाही बहुतांश नागरिक मात्र, अजूनही याविषयी गंभीर झालेले दिसत नाहीत. गुरुवारी याच अनुषंगाने वर्धा येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, नगरपरिषद, बसस्थानक, जिल्हा रुग्णालय, बाजारपेठेत पाहणी केली असता संमिश्र चित्र पाहायला मिळाले. जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नागरिकांची वर्दळ कमी झालेली दिसून आली.आष्टीत बाजारपेठ, हॉटेल्स बंदआष्टी शहरामधील सर्व हॉटेल, किराणा दुकान, कापड दुकाने बुधवारपासून बंद आहेत. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये व एकत्र जमू नये, असे आवाहन करण्यात आल्याने सर्वजण आपल्या घरातच आहेत. कुठेही एकत्र समूह दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा धसका सर्वांनी घेतल्याचे एकूणच चित्र पाहायला मिळत आहे.शीतपेयांच्या हातगाडीवर गर्दीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढावी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आहारात कडधान्याचा समावेश करण्यासोबतच नारळाचे पाणी, दही, मठ्ठा, लस्सी आदी घ्यावे, असा सल्ला दिला जात असल्याने लस्सी, मठ्ठा विक्रीच्या हातगाड्यांवर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.कोरोनाची अशी आहेत लक्षणेकोरोना हा इतर फ्ल्यू सारखाच आजार आहे. त्याची लक्षणेही तशीच असतात. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, श्वसनास त्रास होणे अशी प्राथमिक लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत असतात.वरील लक्षणे आढळणारा व्यक्ती हा कोरोनाग्रस्त असतो, असे नव्हे. जर तो कोरोनाग्रस्त देशातून आलेला असेल, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेला असेल, तरच त्यांना संभाव्य कोरोनासदृश रुग्ण म्हणता येते.या गोष्टी करणे आवश्यकसाबण, हॅण्डवॉश व पाण्याचा वापर करून हात सतत स्वच्छ करावेत. शिंकताना किंवा खोकताना नाकावर व तोंडावर रुमाल झाकावा.सर्दी किंवा फ्ल्यूसदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तातडीने नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला व आवश्यक उपचार घ्यावेत.वेळेत जेवण व पुरेशी झोप घ्यावी. मांसाहार किंवा अंडी खाताना त्या पुरेशा शिजलेल्या किंवा उकडलेल्या आहेत, याची खात्री करावी.या गोष्टी करणे टाळावेसर्दी किंवा फ्ल्यूसृश लक्षणे असलेल्या लोकांशी नजिकचा संपर्क टाळावा. हस्तांदोलन, गळाभेट शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा.सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर थुंकू नये. जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करावा.गर्दीच्या ठिकाणी जाणे तसेच प्रवास करणे शक्यतो टाळावे. शिवाय गर्दी होणारे कार्यक्रम ठेऊ नयेत व अशा ठिकाणी जाणेही टाळायला हवे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस