शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गरम कपड्यांच्या बाजारात शुकशुकाट

By admin | Updated: January 6, 2016 02:47 IST

गत पंधरवड्यात दोन ते तीन दिवस थंडीची लाट पसरली होती. त्यामुळे आणखी काही दिवस थंडीचा भर कायम राहील असा अंदाज होता.

गारठाच नसल्याने ग्राहकांची खरेदीकडे पाठवर्धा : गत पंधरवड्यात दोन ते तीन दिवस थंडीची लाट पसरली होती. त्यामुळे आणखी काही दिवस थंडीचा भर कायम राहील असा अंदाज होता. पण तीनच दिवसात थंडीचा भर ओसरला. त्यामुळे गारठाच नसल्याने ंगरम कपड्याचा बाजारात शुकशुकाट पसरला आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात थंडीची लाट पसरते. रबीचा हंगामही सुरू असल्याने थंडीची आवश्यकता असते. गारठा वाढताच सर्वांनी पावले उनी कपड्यांच्या खरेदीकरिता गरम कपड्यांच्या बाजाराकडे वळतात. उनी कपडे विकण्यासाठी शहरात तिब्बती शरणार्थी व्यावसायिक मोठ्या संख्येने येत असतात. शहरातील जुन्या नगर परिषद परिसरात त्यांनी दुकाने थाटली आहेत. सोबतच इतरत्र किरकोळ दुकाने थाटून कपड्यांची विक्री सुरू आहे. पण या वर्षी थंडीची लाटच नसल्याने नवे कपडे घेण्याचा उत्साह नागरिकांत दिसत नाही. परिणामी बाजारात शुकशुकाट पसरला आहे. केवळ लहान मुलांसाठी उनी कपडे खरेदी करण्याची तेवढी लगबग सुरू आहे. जानेवारी महिन्याला सुरुवात झाली आहे. आणखी पंधरा दिवसांनी संक्रांत सण आहे. हा सण म्हणजे थंडी ओसरून उन्हाळ्याला सुरुवात असते. आणि या काही दिवसात गारठा वाढेल याची शक्यता नाही. त्यामुळे या वर्षी व्यवसायच झाला नसल्याने तिब्बती विक्रेते सांगत आहेत.(शहर प्रतिनिधी)