शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘हात दाखवा, बस थांबवा’ योजना नावाचीच

By admin | Updated: May 24, 2014 00:06 IST

राज्य परिवहन महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी व मोडकळीस आलेल्या महामंडळाच्या उत्पन्नास वाढ होण्यासाठी ‘हात दाखवा, बस थांबवा’ ही योजना सुरू केली,

वर्धा : राज्य परिवहन महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी व मोडकळीस आलेल्या महामंडळाच्या उत्पन्नास वाढ होण्यासाठी ‘हात दाखवा, बस थांबवा’ ही योजना सुरू केली, परंतु चालकाच्या मनमानीमुळे ही योजना कागदावरच आहे. हात दाखविल्यानंतर अनेक बसेस थांबत नाही, अशी प्रवाशांची ओरड आहे. प्रवासी हेच दैवत आहे. असे मानणार्‍या एस. टी. महामंडळाने ‘हात दाखवा बस थांबवा’ ही योजना मोठ्या गाजावाजाने सुरू केली. परंतु या योजनेला चालक-वाहक प्रतिसाद देत नसल्याने ही योजना कागदोपत्रीच रखडत आहे. या योजनेंतर्गत बस थांब्याऐवजी दोन चार प्रवासी असेल तर बस थांबविण्याचे आदेश महामंडळाला देण्यात आले आहे. परंतु प्रवासी बसथांब्यावर पोहोचण्यापूर्वीच बस आलीच व थोड्या अंतरावर असलेल्या प्रवाश्यांनी हात दाखविला तर चालक बस थांब्याऐवजी भरधाव वेगाने बस पुढे नेतो. परंतु बस थांबविण्याचे साधे सौजन्यही दाखवित नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी ही योजना मृगजळ ठरत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहे. यानिमित्त प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. सर्वाधिक सोईस्कर आणि कमी खर्चाचा प्रवास आणि सुरक्षितता या सर्व दृष्टीने एस.टी. महामंडळाला प्रवाशांची पहिली पसंती आहे. असे असले तरी एस.टी. बसेसला हात दाखविण्यातच बराच वेळ निघून जातो. हा प्रकार ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी नित्याचाच झाला आहे. या कारणाने नाईलाजास्तव धोक्यात जीव घालून ग्रामस्थांना अवैधरित्या प्रवास करावा लागतो. काही जण जीव धोक्यात घालून प्रवास करण्याच्या भानगडीत पडत नसल्यामुळे ते मुकाट्याने गावाला न जाता वेळ निघून गेल्यामुळे घराकडे परत जाणे पसंत करतात. शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा नव्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विद्यार्थी पास काढतात. मात्र त्यांनाच एसटीचा फटका सहन करावा लागतो, या गंभीर समस्यांकडे वरिष्ठांनी लक्ष वेधून शासकीय योजनेचा प्रवाशांना लाभ मिळवून देण्याची मागणी ग्रामीण प्रवाशांकडून होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)