शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय स्टेट बँकेत रकमेचा तुटवडा

By admin | Updated: April 22, 2016 04:01 IST

येथील भारतीय स्टेट बँक शाखेत रक्कमेचा तुटवडा असून मागणाऱ्या ग्राहकास गत १५ दिवसांपासून अर्धी रक्कम

हिंगणघाट : येथील भारतीय स्टेट बँक शाखेत रक्कमेचा तुटवडा असून मागणाऱ्या ग्राहकास गत १५ दिवसांपासून अर्धी रक्कम देण्यात येत आहे. त्यामुळे येथील उद्योजक, व्यावसायिक व मोठे गरजवंत नागरिक अडचणीत आले असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.हिंगणघाट हे व्यापाऱ्यांचे शहर आहे. येथील कृषी उत्पन्न बाजारातील धान्यासोबत कापसाची तसेच आॅईल मिल, दाल मिल, जिनिंग-प्रेसींग, आदी उद्योगासोबतच कापड किराणा, हार्डवेअर व्यवसायाची उलाढाल प्रचंड आहे. यातही सध्या लग्न समारंभानिमित्ताने मालाची खरेदी विक्री जोरात आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाल जोरात असताना येथील भारतीय स्टेट बँकेत मात्र रक्कम उपलब्ध नसल्याचे कारणावरून ५० हजारावरील विड्राल त्याप्रमाणात होत नाही. मागेल त्याला अर्धी रक्कम देण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याने व्यापारी, उद्योजक व गरजवंत नागरिक अडचणीत आहे. रिझर्व बँकेकडून रक्कमेचा पुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे व दररोज ५ कोटीची आर्थिक उलाढाल रिझर्व बँकेकडून येणाऱ्या पैशात करणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्व सामान्य नागरिकांना ई बँकींग एटीएम वापराचे ज्ञान अवगत नाही. अनेकांना दुसऱ्याकडून पैसे जमा करणे वा रक्कम काढण्याचे अर्ज भरून घ्यावे लागते. त्यामुळे या बँकेत शेतकरी शेतमजूर वृद्ध नागरिक, व्यापारी, उद्योजकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते; परंतु या बँकेत ग्राहकांच्या व्यवहारासाठी केवळ दोन काऊंटर सुरू ठेवण्यात येत असल्याने ग्राहकांना तासंतास ताटकळत उभे रहावे लागते. तर अनेक जण रांगा पाहून परतही जाते. यामुळे बँक व्यवस्थापकाने या संदर्भात मार्ग काढण्याची मागणी जोर धरत आहे.(तालुका प्रतिनिधी)स्वतंत्र काऊंटरची व्यवस्था करावी ४सध्या स्थितीत बँकेत रकमेचा तुटवडा आहे. यामुळे येथे तासनतास ग्राहकांना उभे रहावे लागते. यामुळे बँक व्यवस्थापनाकडून बँकेत पैसे टाकणाऱ्यांसाठी स्वतंत्र काऊंटरची करण्याची आवश्यकता वर्तविली जात आहे. मागणीच्या प्रमाणात रिझर्व बँकेकडून रक्कमेचा पुरवठा होत नाही. त्यामुळे ग्राहकांना पूर्ण रक्कम देण्यात अडचण येत आहे. बँकेतील गर्दी टाळण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी एटीएम, ई बँकींग, मोबाईल बँकींगचा वापर करण्याची गरज आहे.-गजानन माळवे, शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, शाखा हिंगणघाट