शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी ११०० कोटींचे ध्येय ठरवा

By admin | Updated: May 1, 2016 02:05 IST

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी ८० टक्के कर्ज ३१ मे पूर्वी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, ....

किशोर तिवारी : शेतकऱ्यांना सातबारा व आठ-अ घरपोच मिळणारवर्धा : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी ८० टक्के कर्ज ३१ मे पूर्वी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, यासाठी तहसील कार्यालयातर्फे शेतकऱ्यांच्या याद्या, तसेच सातबारा व आठ अ आदी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील. शेतकऱ्यांना अकराशे कोटी रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा सर्व बँकांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.विकास भवन येथे शनिवारी राष्ट्रीयकृत व खासगी बँकेच्या १३८ बँक व्यवस्थापक, तालुकास्तरावरील महसूल, कृषी, सहकार आदींच्या अधिकाऱ्यांची खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपासंदर्भात बैठक पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. समीर कुणावार, प्रभारी जिल्हाधिकारी दीपक नलवडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, माजी खासदार सुरेश वाघमारे, प्रशांत इंगळे तिगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, नाबार्डच्या स्रेहल बन्सोड यांची उपास्थिती होती. खरीप हंगामासाठी गत वर्षी केवळ ४० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले होते; परंतु यावर्षी ८० टक्के शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना करताना किशोर तिवारी यांनी यावेळी केली. यावेळी ते म्हणाले, शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी ३१ मे पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांला कर्ज पुरवठा होईल, यादृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्यासाठी तालुकानिहाय कर्ज मेळावा घेण्याची सूचना करताना तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी व कृषी सहायक यांनी तालुकानिहाय यादी करून शेतकऱ्यांना आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करून बँकांना उपलब्ध करून द्यावेत. कर्ज मिळण्यासाठी विलंब होणार नाही, यादृष्टीने महसूल यंत्रणा व बँकेच्या शाखा प्रमुखांमध्ये समन्वय ठेवावा, कोरडवाहू, शेतकरी, अल्पभूधारक, सिलिंगमध्ये मिळालेले जमीनधारक तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, असेही यावेळी तिवारी यांनी सांगितले.१.९६ शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करण्याच्या सूचना वर्धा जिल्ह्यासाठी ७०० कोटी रुपये कर्जाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. परंतु १ लाख ९६ हजार शेतकऱ्याना पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचे आहे. याकरिता जिल्ह्याने १ हजार १०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करणे आवश्यक आहे. याकरिता तहसीलदारांकडून गावनिहाय शेतकऱ्यांची यादी तसेच त्यासोबत सातबारा व आठ अ हा नमुना बँकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.