यंदाही विद्यार्थ्यांविना वाजणार शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST2021-06-28T05:00:00+5:302021-06-28T05:00:10+5:30

नवीन कोविडबाधित सापडण्याची गती कमी झाली आहे. असे असले तरी राज्यात कोविड विषाणूच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटने एकाचा बळी घेतल्याने काही मार्गदर्शक सूचना प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबत सावध पवित्राच घेतला जात आहे. कोरोनामुळे पहिली ते पाचवीच्या शाळा मार्च २०२० पासून विद्यार्थ्यांसाठी बंदच आहेत.

The school bell will ring without students this year too | यंदाही विद्यार्थ्यांविना वाजणार शाळेची घंटा

यंदाही विद्यार्थ्यांविना वाजणार शाळेची घंटा

ठळक मुद्देडेल्टा प्लस व्हेरिएंटने वाढविली चिंता : ऑनलाईन पद्धतीने देणार शिक्षणाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात  सोमवारी २८ जूनला शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. असे असले तरी कोविडच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या भीतीमुळे तसेच खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीच शाळांमध्ये उपस्थित राहणार आहेत. तर विविध शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रणालीचा वापर करून शिक्षणाचे धडे देणार आहेत.
सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती कमी झाली आहे. असे असले तरी राज्यात कोविड विषाणूच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटने एकाचा बळी घेतल्याने काही मार्गदर्शक सूचना प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबत सावध पवित्राच घेतला जात आहे. कोरोनामुळे पहिली ते पाचवीच्या शाळा मार्च २०२० पासून विद्यार्थ्यांसाठी बंदच आहेत. तर सहावी ते आठवीच्या शाळा मागील वर्षी डिसेंबर-जानेवारीत सुरू झाल्या होत्या; पण नंतर नवीन कोविडबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शाळांही बंद करण्यात आल्या; पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात आले. ऑनलाइन शिक्षणामुळे लिहिणे, वाचणे तसेच अभ्यासाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये कमी होऊ लागली आहे. तर डोंगराळ व जंगलव्याप्त भागात मोबाइल कव्हरेज राहत नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत आहेत. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा  सुरू करण्याचे  शालेय शिक्षण विभागाने सुतोवाच केले आहे. त्यासाठी विशेष दक्षता घेत प्रयत्नही होत आहेत; पण कोविडच्या नवीन व्हेरिएंटने सध्या सर्वांचीच चिंता वाढविली आहे.

शिक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सोमवार २८ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. शिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती शाळेत राहणार आहे. मात्र, विद्यार्थी शाळेत येणार नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात येणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्यवाही केली जाईल.
-डॉ. मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प. वर्धा.

 

Web Title: The school bell will ring without students this year too