चढत्या उन्हात सेवाग्राम येथे फुलणार सर्वोदयींचा मळा; ४८ वे सर्वोदय समाज संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 04:48 PM2023-03-06T16:48:54+5:302023-03-06T16:50:05+5:30

अण्णा जाधव यांचा गांधी पुरस्काराने होणार सन्मान

Sarvodayi's garden will bloom at Sevagram in the rising sun; 48th Sarvodaya Samaj Samelan | चढत्या उन्हात सेवाग्राम येथे फुलणार सर्वोदयींचा मळा; ४८ वे सर्वोदय समाज संमेलन

चढत्या उन्हात सेवाग्राम येथे फुलणार सर्वोदयींचा मळा; ४८ वे सर्वोदय समाज संमेलन

googlenewsNext

सेवाग्राम (वर्धा) : येथील गांधी आश्रम परिसरातील नवनिर्माण भवनात दि. १४ ते १६ मार्च या कालावधीत ४८ वे सर्वोदय समाज संमेलन होणार आहे. या संमेलनात ज्येष्ठ सर्वोदयी अण्णा जाधव यांचा ‘गांधी पुरस्कार’ देऊन सन्मान होणार असून, संमेलनाच्या निमित्ताने मार्च महिन्यातील चढत्या उन्हात सेवाग्राम येथे सर्वोदयींचा मळाच फुलणार आहे.

४८ व्या सर्वोदय समाज संमेलनाचे उद्घाटन १४ मार्चला सकाळी ११ वाजता निर्वासित तिब्बेत सरकारचे माजी प्रधानमंत्री प्रो. सामदोंग रिनपोछे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष अमरनाथ भाई राहतील, तर मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय गांधी संग्रहालय, दिल्लीच्या अध्यक्ष तारा गांधी भट्टाचार्य, वर्धा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुनील केदार, सर्वोदय समाज संमेलनाचे संयोजक डॉ. सोमनाथ रोडे, सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आशा बोथरा, कस्तुरबा आरोग्य संस्थेचे अध्यक्ष धीरू मेहता, गांधी स्मारक निधी, दिल्लीचे अध्यक्ष रामचंद्र राही, गांधी शांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार प्रशांत, सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, गांधी संग्रहालय, दिल्लीचे संचालक अण्णामलाई, ज्येष्ठ गांधी विचारवंत रमेश ओझा, पवनार आश्रमचे गौतम बजाज उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, अशोक शरण, गौरांग महापात्र, सवाई सिंग, अरविंद कुशवाह, शेख हुसैन, प्रदीप खेलूरकर, हरिभाऊ वेरूळकर, डॉ. विभा गुप्ता, कुमार शुभमूर्ती, सचिन राव, मीनाक्षी नटराजन, प्रफुल्ल गुडधे, मनोज चांदूरकर, रामधीरज भाई, रमेश दाने, माधव सहस्त्रबुद्धे, करुणा फुटाणे, बजरंग सोनवणे, सुदाम पवार, भरत महोदय, एन. सुंदराजन, सुरेश एच. एस., चिन्मय मिश्र, जवरीमल वर्मा, खम्मनलाल शांडिल्य, इस्लाम हुसैन, पी. वी. सदाशिवम, जशोमती बहन, विश्वजित घोराई, मिहीरप्रसाद दास, शंकर नायक, जय भगवान वर्मा, शंकर बगाडे, एकनाथ डगवार, सुरेश कुमार, रमेश झाडे, संजय बेहरे, ॲड. वंदन गडकरी, शंकर राणा यांचीही प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

Web Title: Sarvodayi's garden will bloom at Sevagram in the rising sun; 48th Sarvodaya Samaj Samelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.