शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीला प्रारंभ

By admin | Updated: May 15, 2014 23:50 IST

जिल्ह्यात २३ मार्च रोजी ३0७ ग्रामपंचायतीकरिता मतदान झाले. यानंतर निवडणुकींचे निकालही जाहीर झाले. निवडणुकीत विजयी झालेल्या व सरपंचपदाच्या शर्यतीत असलेल्या

वर्धा : जिल्ह्यात २३ मार्च रोजी ३0७ ग्रामपंचायतीकरिता मतदान झाले. यानंतर निवडणुकींचे निकालही जाहीर झाले. निवडणुकीत विजयी झालेल्या व सरपंचपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांना सरपंच पदाची प्रतीक्षा लागली होती. ही प्रतीक्षा गुरुवारी संपली. जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीला प्रारंभ झाला. जिल्ह्यात इतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या दिवसात होतील. सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकाचा कार्यक्रम २७ मे पर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने कळले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

सेलू तालुक्यातील सुकळी(बाई) या नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीकरिता सरपंच, उपसरपंचाची निवडणूक अधिकारी व्ही.बी. बिल्लेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सरपंच पदी दिलीप खिराळे तर उपसरपंचपदी अनिल म्हैसगवळी यांची बहुमताने निवड केली. यावेळी सहाय्यक म्हणून ग्रामसेवक राजू सपकाळ, तलाठी बाबा पटले यांनी काम पाहिले.

खैरी येथील सात सदस्यीय ग्रामपंचायतीकरिता झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी सुधाकर नाखले, उपसरपंच मनिष सुरजूसे यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून एम. व्ही. नागपूरकर, ग्रामविकास अधिकारी ए.व्ही. धमाळे यांनी काम सांभाळले.

सोनेगाव(स्टे.) येथील निवडणुकीत सरपंचपदी समता विलास कालगाडगे यांची वर्णी लागली तर उपसरपंचपदी अतुल वसंतराव पवार यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार मंथनवार, ग्रामसेवक संतोष शिंदे यांनी काम पाहिले.

इंझापूर येथे भाजप गटाचे सरपंच व उपसरपंच निवडून आले. सरपंचपदी पंकज रामदास येरने, उपसरपंच संजय वासुदेव आलोने यांची निवड झाली. भुगाव येथे सरपंच पदाकरिता प्रिया शरद उगेमुगे यांची बहुमताने निवड झाली. उपसरपंचपदी राजू नत्थू नाखले यांची निवड झाली.

केळझर येथील १३ सदस्यीय ग्रामपंचायतीत एक जागा रिक्त असल्याने १२ सदस्यांनी मतदान केले. यात सरपंचपदी रेखा विलास शेंडे, उपसरपंच फारुख करीम शेख यांची बहूमताने निवड केली. निवडणूक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी माने यांनी काम पाहिले.

गायमुख-जुनगढ या गट ग्रामपंचायतीत सरपंच पदावर आनंद पिंपळे, उपसरपंचपदी पुष्पा नेहारे यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी एन.डी.बेताल, ग्रामसेवक सिंधू डोंगरे, तलाठी पावडे यांनी काम पाहिले.

विजयगोपाल ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ११ पैकी १0 उमेदवार ग्रामसुधार समितीचे उमेदवार बहूमतांनी निवडून आले. सरपंचपदी निलम संजय बिन्नोड यांची एक मताने निवड झाली. तर उपसरपंच पदी साहेबराव शंकर कलोडे यांची निवड करण्यात आली.