शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये वाळूची तस्करी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

सोरटा परिसरातील वर्धा नदीच्या या बाजूला वर्धा जिल्हा तर त्या बाजूला अमरावती जिल्हा आहे. शिवाय सध्या महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोरोनामुळे व्यस्त असल्याच्या संधीचे सोनेच काही वाळू माफियांकडून केले जात होते. याच गैरप्रकाराची माहिती आर्वीच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाने १० ब्रास वाळूसह चार तराफे केले जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यातील सोरटा येथील वर्धा नदी पात्रातून अवैध पद्धतीने उत्खनन करून वाळूची चोरी केली जात असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून दहा ब्रास वाळू व चार तराफे जप्त केले. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.सोरटा परिसरातील वर्धा नदीच्या या बाजूला वर्धा जिल्हा तर त्या बाजूला अमरावती जिल्हा आहे. शिवाय सध्या महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोरोनामुळे व्यस्त असल्याच्या संधीचे सोनेच काही वाळू माफियांकडून केले जात होते. याच गैरप्रकाराची माहिती आर्वीच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.आर्वी तालुक्यातील सोरटा परिसरात तराफेच्या सहाय्याने वाळू तस्करांकडून नदीपात्रातील वाळूचे उत्खनन केले जात होते. महसूल विभागाचे अधिकारी येत असल्याचे लक्षात येताच मनमर्जीने उत्खनन करणाºयांनी घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्या आदेशान्वये चार तराफे जेसीबीच्या साह्याने नष्ट करण्यात आले तर वाळू माफियांनी ढिग करून ठेवलेली दहा ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. विनायक नगर, सागर झाडे भास्कर कुकडे, अविनाश अजमिरे शैलेश पाझारे यांनी ही कारवाई केली.यासंदर्भात आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने तेथे छापा टाकला. चार तराफाचे साह्याने वाळू गोळा करणे सुरू होते. ते तराफे आम्ही नष्ट केले असून सुमारे दहा ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. हे वाळू माफिया पुलगावच्या वल्लभनगर येथील असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. अमरावती जिल्ह्यातील अधिकाºयांनाही माहिती दिली.-विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, आर्वी.

टॅग्स :sandवाळू