शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपसा; ८ तस्करांना बेड्या, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

By रवींद्र चांदेकर | Updated: May 22, 2024 21:06 IST

- पारडी, उमरा घाटावर पोहचले एसपी : जेसीबी अन् पोकलॅन्डद्वारा सुरू होता वाळू उपसा

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील पारडी आणि उमरा येथील वाळू घाटावर पोलिसांनी छापा मारला असता, बोर नदीपात्रातून जेसीबी अन् पोकलॅन्डच्या साहाय्याने वाळूचा वारेमाप उपसा करताना वाळू तस्करांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई २१ रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक नुरुल हसन, सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी १२ तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आठ तस्करांना अटक केली तसेच दोन कोटी ६० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्यांत सतीश वाघमारे (रा. सेलू), अरविंद गांडगे, सूरज दाते (रा. हिंगणी), चंद्रकांत साखरे (रा. येराखेडी), संदीप रामदास मडावी (रा. धनोली मेघे), संजय ससाने (रा. पारडी), महेश बेहरे (रा. दहेगाव), निकेस गहुकर यांचा समावेश आहे तर भूषण वाघमारे (रा. सेलू), सूरज होले (रा. वर्धा), नामदेव गोडामे (रा. सालई पेवट), निखिल रोकडे (रा. सिंदी), निखिल गोडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समुद्रपूर तालुक्यात असलेल्या पारडी आणि उमरा वाळू घाटातील बोर नदीपात्रावरून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यावरून पोलिसांनी २१ रोजी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरसीपी पथकासह छापा मारला असता जेसीबी आणि पोकलॅन्डच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैधरित्या उपसा करून टिप्परमधून वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी छापा मारत आठ वाळू तस्करांना बेड्या ठोकल्या तर १२ तस्करांविरुद्ध समुद्रपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, आर्थिक गुन्हे शाखेचे कांचन पांडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर, रामदास दराडे, भूषण हाडके यांच्यासह पोलिस मुख्यालयातील एक पथक आणि आरसीपी पथकाने केली.

.................दोन जेसीबी, कार अन् पोकलॅन्डसह टिप्पर जप्त

वाळू घाटावर छापा मारून पोलिसांनी एमएच. ३२ एजे. ५५८८ क्रमांकाचा दहा चाकी टिप्पर, एमएच. ३२ एजे. ३३८८ क्रमांकाचा टिप्पर, एमएच. ३२ एजे. ७१६२ क्रमांकाचा टिप्पर, एमएच. ३२ एजे. १००६, एमएच. ३१ सीबी. ६०३० क्रमांकाचा जेसीबी, विना क्रमांकाचा पोकलॅन्ड, एमएच. ४० बीई. ६८६६ क्रमांकाचा जेसीबी आणि एक एमएच. ३२ एएस. ७७६६ क्रमांकाची चारचाकी असा एकूण २ कोटी ६० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला...................

आठ दिवसांपासून ठेवली बारीक नजरसमुद्रपूर तालुक्यातील पारडीसह उमरा वाळू घाटातून वाळूचा वारेमाप उपसा सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक हसन यांना मिळाली होती. त्यांनी विविध पथकांना वाळू घाटावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच तस्करांनी आपली तस्करी बंद केली होती. मात्र, पोलिस अधीक्षकांनी सहायक पोलिस अधीक्षक चव्हाण यांच्या पथकालाही कारवाईबाबत सतर्क केले होते. त्यामुळे पुलगाव विभागाकडून नजर ठेवली जात होती. अखेर तस्करांनी डोके वर काढताच मध्यरात्री थेट छापा मारून त्यांचा डाव हाणून पाडला.

टॅग्स :wardha-acवर्धा