शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत विना परवाना व्यवसाय करणाऱ्या चहा कंपनीवर विक्रीबंदी

By admin | Updated: February 21, 2017 01:05 IST

सावंगी (मेघे) येथील रॉयल ब्लेंड अ‍ॅन्ड पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या चहा कंपनीची चौकशी केली असता येथे विनापरवाना चहाचे उत्पादन व रिपॅकींग होत असल्याचे निदर्शनास आले.

रद्दबादल परवान्यावर व्यवसाय : १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त; औषध प्रशासनाची कारवाई वर्धा : सावंगी (मेघे) येथील रॉयल ब्लेंड अ‍ॅन्ड पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या चहा कंपनीची चौकशी केली असता येथे विनापरवाना चहाचे उत्पादन व रिपॅकींग होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सदर कंपनीत उत्पादित केलेला १ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा चहाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच विना परवाना व्यवसाय करीत असल्यामुळे पुढील आदेशापर्यंत सदर कंपनीद्वारे चहाचे उत्पादन व विक्री करण्यात येऊ नये, असे आदेश सदर पेढीचे मालक सॅम पिटरला अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) जयंत वाणे यांनी दिले आहे. अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी २०१७ रोजी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी, ललीत सोयाम व रविराज धाबर्डे यांनी सावंगी स्थिती कलावती कॉम्पलेक्समधील रॉयल ब्लेंड अ‍ॅन्ड पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भेट दिली होती. सदर पेढीच्या तपासणीअंती त्यांच्याकडे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गचा अन्न व्यवसाय करण्याकरिता आवश्यक असणारा परवाना सप्टेंबर २०१६ मध्ये संपल्याचे दिसून आले. असे असताना या पेढीने त्याचे नुतनीकरण केले नव्हते. त्यामुळे सदर पेढी आॅक्टोबर २०१६ पासून विना परवाना रेक्स ब्रॅन्ड या चहापत्तीचे उत्पादन व विक्री करीत असल्याचे पेढीच्या कागदपत्रावरून लक्षात आले. सदर पेढीत रेक्स ब्रॅन्डचे २५० ग्रॅम व १०० ग्रॅम पॅकेट्स विक्रीकरिता उत्पादन करून साठवणूक केली असल्याचे आढळून आले होते. सदर उत्पादीत केलेल्या चहापत्ती पावडर रेक्स ब्रॅन्डच्या पॅकेटवर मुदत संपलेला परवाना क्रमांक टाकून शासन व ग्राहकांची दिशाभूल करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी ललीत सोयाम यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत सदर पेढी विना परवाना व्यवसाय करीत असल्यामुळे एकूण किंमत १ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.तसेच सदर पेढी विना परवाना व्यवसाय करीत असल्यामुळे पुढील आदेशापर्यंत चहापत्तीचे उत्पादन, विक्री, साठवणूक तसेच वितरण करू नये, असे लेखी आदेश सहायक आयुक्त (अन्न), तथा पदावधीत अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म.रा.) वर्धाचे जयंत वाणे यांनी सदर पेढीचे मालक सॅम पिटर यांना दिले आहेत. सदरची संपूर्ण कार्यवाही कार्यालयातील अधिकारी ललीत सोयाम व रविराज धाबर्डे यांनी जयंत वाणे यांच्या मार्गदर्शनात केली.(प्रतिनिधी)