शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

मृत महिलेस जिवंत दाखवून शेतीची विक्री; पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 16:47 IST

साखरा येथील बहीण, भाऊ, आई यांच्या संयुक्त नावाने असलेल्या शेतजमिनीची विक्री एका भावाला दारू पाजून तसेच बोगस शेतमालक खरेच शेतमालक असल्याचे दाखवून करण्यात आली.

समुद्रपूर : तालुक्यातील साखरा येथील बहीण, भाऊ, आई यांच्या संयुक्त नावाने असलेल्या शेतजमिनीची विक्री एका भावाला दारू पाजून तसेच बोगस शेतमालक खरेच शेतमालक असल्याचे दाखवून करण्यात आली. इतकेच नव्हे तर हा प्रकार पूर्णत्त्वास नेताना मृत महिलेला जिवंत असल्याचे दाखविण्यात आले. या प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, साखरा येथील कुणाल अरुण गोवारकर, महेश अरुण गोवारकर, कल्याणी अरुण गोवारकर तसेच दिवंगत  विद्या अरुण गोवारकर याच्या नावाने मौजा पिपरी शेत सर्वे क्र. १५० / २ आराजी ४.२८ हेक्टर आर ही शेतजमीन आहे. वडिलोपार्जित असलेल्या या शेतजमिनीची बनावट दस्ताऐवजाच्या जोरावर विक्री करण्यात आली. महेश गोवारकर याला दारूचे व्यसन असल्याने शेत दलालांनी त्याचे भाऊ कुणाल, बहीण कल्याणी व मृत आई विद्या यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड तयार केले. शिवाय कुणाल गोवारकर याच्या जागेवर वैभव तामगाडगे, बहीण कल्याणी हिच्या जागेवर पुजा टोहकर तर मृत विद्या गोवारकर यांच्या जागेवर नंदा पाटील यांना हेच ते व्यक्ती म्हणून उभे करण्यात आले. तसेच नागपूर येथील निरावती चंद्रकांत बोंडादे यांना २८ नोव्हेंबर २०१९ला सदर शेतजमिनीची विक्री करून दिली. ज्यांना विक्री करून दिली त्या महिलेकडून ७ लाख २५ हजार रुपये उकळण्यात आले.आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी महेश गोवारकर हा मद्यधुंद अवस्थेत असताना यांच्या हातात रक्कम ठेवून त्याचे छायाचित्र घेतले. तर पैसे पुन्हा परत घेऊन त्याला केवळ दहा हजार रुपये दिले. उर्वरित पैशाचा आरोपींनी अपहार करीत शेतमालकाची फसवणूकच केली. कुणाल गोवारकर याला या विक्रीबाबतची माहिती मिळताच त्याने समुद्रपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय गाठून चौकशी केली. शिवाय काही कागदपत्र मिळविले. त्या कागदपत्रांमधील बनावट फोटो, बोगस दस्ताऐवज पाहून त्याचीही भंबेरी उडाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने समुद्रपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी तक्रारीवरून महेश अरुण गोवारकर, निरावती चंद्रकांत बोंडादे, अर्जनविस डि. एन. पांडे रा. हिंगणघाट, वैभव बाबाराव तामगाडगे, पुजा दिलीप टोहोकर, नंदा रामदास पाटील, भैया बापुराव शेंडे रा. हिंगणा डिगडोह,  चंद्रकांत दशरथ बोंडादे रा. नागपूर,  देवानंद उत्तम तामगाडगे, रवी चव्हाण, गुरुदास पवार व इतर यांच्यावर समुद्रपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. याच दलालांनी आणखी किती लोकांना गंडा घातला याची चौकशी सध्या ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात निलेश पेठकर, चेतन पिसे करीत आहेत.