शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जिल्ह्यात रस्ता अपघाताने घेतले १८७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवून वाहतूक करणे, सुसाट वाहन पळविणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आदी गोष्टी रस्ता अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. त्यामुळे सदर बाबींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते.

ठळक मुद्दे१७६ गंभीर जखमी : मृतांमध्ये पुरुषांची संख्या जास्त

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करा असे आवाहन सर्वच स्तरातून केले जात असले तरी जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत गांधी जिल्ह्यात झालेल्या ४८८ रस्ते अपघातांमध्ये १८७ व्यक्ती ठार झाल्याचे वास्तव आहे. इतकेच नव्हे तर १७६ व्यक्ती गंभीर जखमी झाले. दिवसेंदिवस वाढत असलेले अपघात लक्षात घेऊन यंदाच्या ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान वाहतूक नियमांचे पालन कसे गरजेचे आहे याविषयी प्रभावी जनजागृती होण्याची गरज आहे.दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवून वाहतूक करणे, सुसाट वाहन पळविणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आदी गोष्टी रस्ता अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. त्यामुळे सदर बाबींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. वाहतूक नियमांकडे पाठ दाखविणाऱ्या अनेकांवर वर्षभऱ्यात दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. परंतु, तरुण मंडळी वाहतूक नियमांना फाटाच देत असल्याचे चित्र बघावयास मिळते. परिणामी, तरुणांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वर्षभºयात जिल्ह्यात एकूण ४८८ रस्ते अपघात झाले असून यात १८७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १७१ पुरूष तर १६ महिलांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.५७ अपघातात सुदैवाने दुखापत टळलीजिल्ह्यातील ९२ अपघातांमध्ये १७६ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. तर ५७ अपघातांमध्ये सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. असे असले तरी वाहनांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.पोलिसी कारवाईबाबत गैरसमज कायमअपघात झाल्याचे निदर्शनास आल्यावर काही व्यक्ती सामाजिक बांधिलकी जोपासत जखमींना मदत करतात. तर काही व्यक्ती तेथून पळ काढण्यातच धन्यता मानतात. अपघातातील जखमींना मदत केल्यास आपणही पोलिसांच्या कार्यवाहीत अडकू असा गैरसमज अजूनही कायम असल्याने तो कसा दूर करता येईल याविषयी रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रभावी काम होणे गरजेचे आहे.एकाचाही गौरव नाहीअपघात झाल्याचे लक्षात येताच अनेक नागरिक घटनास्थळी गर्दी करतात. नागरिकांच्या या गर्दीतील काहीच व्यक्ती सामाजिक बांधिलकी जोपासत जखमींना रुग्णालयात दाखल करतात. परंतु, पोलीस विभाग असो वा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून जखमीला रुग्णालयापर्यंत नेणाºया अशा एकाही व्यक्तीला आतापर्यंत गौरविण्यात आले नसल्याची शोकांतीका आहे.

टॅग्स :Accidentअपघात