चक्क एप्रिल महिन्यात नदी वाहतेय ओसंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:00 AM2020-04-10T05:00:00+5:302020-04-10T05:00:07+5:30

कालांतराने पर्जन्यमान कमी होत गेल्यामुळे भदाडी नदीचे जलपात्र जानेवारी महिन्यातच कोरडे व्हायला सुरुवात होत होत. मार्च, एप्रिल महिन्यात तर एक थेंबही पाणी राहात नव्हते. यामुळे शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत घट होत होती. तर काही विहिरी कोरड्याठाक होत होत्या. परिणामी, गुरांच्या पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या उद्भवत होती.

The river is flowing full of water in April | चक्क एप्रिल महिन्यात नदी वाहतेय ओसंडून

चक्क एप्रिल महिन्यात नदी वाहतेय ओसंडून

googlenewsNext
ठळक मुद्देचिकणी, पढेगाव शिवारातील जलसाठा वाढला : जानेवारीतच कोरडेठाक व्हायचे नदीपात्र

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : चिकणी, जामणी, पढेगाव शिवारातील भदाडी नदी एप्रिल महिन्यातही ओसंडून वाहत आहे. दोन वर्षांपूर्वी हीच नदी जानेवारी महिन्यातच मृतावस्थेत येत होती. आता मात्र ओसंडून वाहत असून जलसाठ्यातही कमालीची वाढ झाली आहे.
वायफड नजीकच्या लोणसावळी टेकडीमधून उगम असलेली भदाडी नदी वायफड, दहेगाव, जामणी, चिकणी, पढेगाव, सेलसुरा असा मार्गक्रमण करून सरूळजवळ यशोदा नदीत विलीन झाली. ४०-५० वर्षांपूर्वी ही नदी एप्रिल महिन्यातसुद्धा वाहायची, असे वयोवृद्ध सांगतात.
कालांतराने पर्जन्यमान कमी होत गेल्यामुळे भदाडी नदीचे जलपात्र जानेवारी महिन्यातच कोरडे व्हायला सुरुवात होत होत. मार्च, एप्रिल महिन्यात तर एक थेंबही पाणी राहात नव्हते. यामुळे शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत घट होत होती. तर काही विहिरी कोरड्याठाक होत होत्या. परिणामी, गुरांच्या पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या उद्भवत होती.
दोन वर्षांपूवीर जलयुक्त शिवारअंतर्गत जमनलाल बजाज फाऊंडेशनच्या वतीने भदाडी नदीसह नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरण करण्यात आले. काही अंतराच्या फरकाने खड्डे करण्यात आलेत आणि गावाच्या आसपास बंधारे सुध्दा बांधण्यात आले. यामुळे नदीपात्राच्या जलसाठ्यात वाढ झाली व एप्रिल महिन्यात सुध्दा नदी पात्रात पाण्याची वाहती धार पाहावयास मिळते. यामुळे शेतकऱ्यांसह गोपालकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: The river is flowing full of water in April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.