शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे विक्रीप्रकरणी कृषी केंद्राचा परवाना रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

शेतकरी शितल चौधरी यांनी एका कृषिसेवा केंद्रातून ६५ बियाण्यांचे बॅग खरेदी केले.पण, बियाणे उगविलेच नसल्याने शेतकºयाचे लाखोंचे नुकसान झाले. कृषिमंत्री दादाजी भूसे यांची भेट घेत त्यांच्यापुढे शेतकऱ्यांची व्यथा मांडली असता त्यांनी कृषिकेंद्र चालक, निर्माता व कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश देत परवाना रद्द करून दुकान सील करण्याबाबत सांगितले.

ठळक मुद्दे गुन्हा दाखल करण्याची मागणी : कृषिमंत्र्यांना शिवसेनेचे निवेदन, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोविंदपूर येथील शेतकरी शितल चौधरी यांना बोगस बियाणे देत फसवणूक केल्याप्रकरणी कृषी केंद्रचालकाचा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे यांच्या नेतृत्त्वात कृषिमंत्री दादाजी भूसे यांना निवेदनातून करण्यात आली.शेतकरी शितल चौधरी यांनी एका कृषिसेवा केंद्रातून ६५ बियाण्यांचे बॅग खरेदी केले.पण, बियाणे उगविलेच नसल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले. कृषिमंत्री दादाजी भूसे यांची भेट घेत त्यांच्यापुढे शेतकऱ्याची व्यथा मांडली असता त्यांनी कृषिकेंद्र चालक, निर्माता व कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश देत परवाना रद्द करून दुकान सील करण्याबाबत सांगितले. परंतु, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच विभागीय महासंचालकांकडून अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. येत्या १५ दिवसात पीडित शेतकऱ्याला मोबदल्याच्या स्वरुपात न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.बियाण्यांसह तणनाशकही निघू लागले बोगसअनेक शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले असून सोयाबीनची उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला. त्यातच आता शेतकऱ्यांनी शेतात तणनाशकाची फवारणी केली असता त्याचा काहीही उपयोग झाला असून वाढलेले तण जैसे थेच असल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे मात्र, कृषीविभागाचे डोळे बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे.बथदिवे, वीजखांब बसविण्याची मागणीवडनेर : वडनेर गाव हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून गावातून राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे.महामार्गाच्या दोन्ही बाजूला गाव वसलेले आहे. पथदिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास रस्त्यावर काळोख असतो. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना अंधारात रस्ताच दिसत नसल्याने अनेकांचे अपघातही झाले आहे. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होवू नये, यासाठी महामार्गालगत पथदिवे आणि विद्युत खांब लावण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.वीजबिल माफ करा; दिलीप अग्रवाल यांची मागणीलॉकडाऊनच्या काळात छोटे-मोठे उद्योग धंदे बंद असल्याने नागरिकांचा रोजगारही हिरावला. अशा परिस्थितीत नागरिकांना कुटुंबाचा गाडा चालविणेही कठीण झाले होते. अशा विवंचनेत असतांना नेहमी पेक्षा तिप्पट वीज देयक आल्यामुळे नागरिकांना अवाजवी वीज देयके भरणे शक्य नाही. आधीच लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या हाताला काम नाही, सर्व दैनदिन व्यवसाय ठप्प आहेत. ठप्प असलेले सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी नागरिकांना ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे नागरिकांचे वीजबिल माफ करण्याची मागणी दिलीप अग्रवाल यांनी प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे.

टॅग्स :agricultureशेती