शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाकडून दौऱ्यातील व्यवस्थेचा आढावा

By admin | Updated: November 19, 2014 22:45 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २६ नोव्हेंबर रोजी जी़एस. कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित शिक्षा मंडळाच्या सुवर्ण जयंती महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. बजाजवाडी, गांधी ज्ञान मंदिर

वर्धा : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २६ नोव्हेंबर रोजी जी़एस. कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित शिक्षा मंडळाच्या सुवर्ण जयंती महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. बजाजवाडी, गांधी ज्ञान मंदिर व सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमासही ते भेट देणार आहेत़ राष्ट्रपतींच्या आगमन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी एन. नवीन सोना व पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी आढावा घेतला. राष्ट्रपती सेवाग्राम आश्रमात भेट देणार असून सामूहिक प्रार्थनेत सहभागी होणार आहे़ राष्ट्रपतींच्या हस्ते बकुळ वृक्ष लावण्यात येणार आहे. आश्रम परिसरात राष्ट्रपतींच्या आगमनापासून गांधीकुटी, आदि निवास तसेच परिसराच्या भेटीबाबत कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. शिक्षा मंडळाच्या शतक महोत्सवी समारंभ जी.एस. कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित आहे़ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे़ यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्या सागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिक्षा मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे़ कार्यक्रमाच्या व्यवस्थेसह बजाजवाडी, गांधी ज्ञान मंदिराच्या राष्ट्रपती भेटीबाबत व्यवस्थेची यावेळी पाहणी करण्यात आली. राष्ट्रपतींचे कॉलेजच्या मागील प्रांगणात विशेष तयार केलेल्या हेलीपॅडवर दुपारी आगमण होईल़ वर्धा येथील नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वायुदलाच्या विशेष हेलीकॉप्टरने सायंकाळी येथून नागपूरसाठी प्रयाण करतील.निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड, शिक्षा मंडळाचे संजय भार्गव, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुरेंद्र भुयार, पोलीस व महसूल, आरोग्य आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी आढावा बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)