शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पुनर्भरणाने दुष्काळावर मात

By admin | Updated: July 5, 2014 01:10 IST

राज्यात पाणलोटनिहाय वॉटर बजेटिंगचा आराखडा तयार करावा. नदी नाल्याची पूर्वीची रूंदी, खोली जपावी, नदी नाल्याच्या पात्रातील कचारा साफ करावा.

प्रफुल्ल लुंगे सेलूराज्यात पाणलोटनिहाय वॉटर बजेटिंगचा आराखडा तयार करावा. नदी नाल्याची पूर्वीची रूंदी, खोली जपावी, नदी नाल्याच्या पात्रातील कचारा साफ करावा. यामुळे पुराच्या दिवसात वा नदीला पाणी वाहत असताना मोठ्या प्रमाणात पुनर्भरण होईल. भूजलांच्या उपलब्धतेनुसार पाणी उपस्यावर नियंत्रण ठेवावे़ या उपाय योजनामुळे भविष्यात येणाऱ्या पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल़ महाराष्ट्र ८० टक्के काळ्या पाषाणाने व्यापलेला आहे़ काळा पाषाण (डेकन ट्याप) हा अग्नी जन्य खडक आहे़ तो पृथ्वीच्या गर्भातून निघालेल्या लाव्हा रसामुळे तयार झालेला आहे़ या पाषाणाचे थर साधारण ३० ते ४० फुटाचे असतात़ या पाषाणाच्या दोन थरामध्ये साधारणात: ६ इंच पासून १५ फुटापर्यंत लाल माती (रेड बोल) अथवा ग्रिन बोलचा थर असतो़ पाषाणाच्या थराचा वरचा भाग सचिद्र, मधला भाग साधारण पक्का व खालचा भाग पक्का असतो़ यामध्ये बारिक भेगा असतात़ या पाषाणातील सचिंद्र तथा भेगाच्या पाषाणात जल साठा समावून ठेवण्याची क्षमता १ ते ३ टक्के असते़महाराष्ट्रामध्ये नाले तथा लहान मोठ्या नद्यावर छोटे बंधारे मध्यम बंधारे तथा लहान-मोठी धरणे झालेली आहे़ पाणलोटाची कामे सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे़ याचा परिणाम भूजल साठा वाढविण्याकरिता नक्कीच झालेला आहे़ ओलिताच्या, पिण्याच्या पाण्याच्या तथा औद्योगिक क्षेत्राच्या विहिरींची कामे झालेली आहेत. असे असले तरी उन्हाळ्याच्या दिवसात दुष्काळाचा समाना करावा लागतो़ भूजलाचे पाणलोट निहाय वॉटर बजेटिंग भूजल सर्वेक्षण करून यंत्रणा राबविल्या जाते़ या यंत्रणेला मात्र पुरेसे अधिकार नाहीत. दुष्काळ परिस्थितीवर मात करण्याकरिता भूतकाळात जाणे आवश्यक आहे़ भूतकाळात नदी नाले तथा मोठ्या नद्यावर बंधारे तथा मोठी धरणे नव्हती़ नदी नाल्यांना कोणताही अडथळा नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा पूर जात होते़ पुरामुळे नदी नाले स्वच्छ होत होते़ नैसर्गिक दृष्ट्या पुराच्या पाण्याच्या दबावामुळे भूगर्भात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या रिर्चाज द्वारे जल साठा वाढत होता़ छोटे मोठे बंधारे व धरणामुळे पावसाळ्यात नदी नाल्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले़ नदी नाल्यामध्ये झाडे झुडपांची संख्या वाढली़ गाळाचे प्रमाण वाढले व नदी नाले उथळ झाले़ यामुळे पावसाच्या दिवसात पुरामुळे होणोरे भूजल पुनर्भरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम झाला़