शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सिकलसेलच्या ९०१ रुग्णांची नोंद

By admin | Updated: June 21, 2017 00:50 IST

महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला आहे.

राज गहलोत : वाहकांची संख्या तब्बल ११ हजार ८२१ लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला आहे. वर्धा जिल्ह्यात सिकलसेलचे ९०१ रुग्ण आणि ११ हजार ८२१ वाहक आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. सिकलसेल वाहकाने निरोगी व्यक्तीशी विवाह केल्यास येणारे अपत्य निरोगी जन्माला येण्याची शक्यता अधिक असते. यासाठी लग्नापूर्वी उपवर मुला-मुलींच्या रक्ताची तपासणी व समाजात याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. राज गहलोत यांनी व्यक्त केले. १९ जून रोजी जागतिक सिकलसेल दिनाचा कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य विभाग व नामदेव महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क विभाग) डॉ. विनोद वाघमारे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्कचे प्राचार्या डॉ. आनंदप्रकाश भेले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अनुजा बारापात्रे, मेट्रन पुनसे, आशा नगराळे आदी उपस्थित होते. सिकलसेल आजार हा आदिवासी भागात अधिक प्रमाणत आढळून येतो; पण जिल्ह्याची सिकलसेल रुगणांची संख्या पाहिल्यास या आजाराची गंभिरता लक्षात येते. पुढील पिढीला या आजारापासून वाचविण्याकरिता गर्भवती मातेने पहिल्या तीमाहित गर्भजल चाचणी परीक्षण करणे महत्त्वाचे आहे. याद्वारे बाळाला हा आजार आहे वा नाही, हे कळू शकते. योग्य औषधोपचाराने सिकलसेल रुग्णही साधारण व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगू शकतो, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. डॉ. रेवतकर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. भेले यांनी आरोग्य विभाग व समाजकार्य विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तळागाळातील व्यक्तींचे समूपदेशन करून जागृती करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन केले. शंकर तायडे यांनी रुग्णांना चांगले व दीर्घायुष्य जगण्याकरिता योगाचे महत्त्व काय, याबाबत माहिती दिली. नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादरीकरणातून संदेश दिला. संचालन सिकलसेल समुपदेशक देवांगण वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक करीत आभार अन्नपूर्ण ढोबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रशांत कठाणे, अंकुश कांचणपुरे, प्रभाकर पाटील, जयश्री, जयमाला, हर्षद ढोबळे, राहुल बुचुंडे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.