शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

वादळी वाऱ्यामुळे शेतातील गोठे आणि घरांची पडझड झाली. जनावरांसाठी सहा महिने पुरेल एवढ्या वैरणाची व्यवस्था करून ठेवलेल्या असंख्य शेतकऱ्यांजवळ असणारा चारा शेतातच ओलाचिंब झाल्याने वैरणाचे संकट ओढवले आहे. गोठ्यांची डागडुजी करण्यात व्यस्त शेतकºयांना रात्रीच्या वेळी येणाऱ्या वादळामुळे जीव मुठीत धरून बसावे लागत आहे.

ठळक मुद्देउन्हाळवाही की जांभूळवाही? : शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला पेच

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : प्रखर उष्णतामानाच्या मे महिन्यात सातत्याने येत असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जनजीवन विस्कळित होत आहे. उन्हाळवाही पूर्णत: नाहीशी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने केळी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.वादळी वाऱ्यामुळे शेतातील गोठे आणि घरांची पडझड झाली. जनावरांसाठी सहा महिने पुरेल एवढ्या वैरणाची व्यवस्था करून ठेवलेल्या असंख्य शेतकऱ्यांजवळ असणारा चारा शेतातच ओलाचिंब झाल्याने वैरणाचे संकट ओढवले आहे. गोठ्यांची डागडुजी करण्यात व्यस्त शेतकºयांना रात्रीच्या वेळी येणाऱ्या वादळामुळे जीव मुठीत धरून बसावे लागत आहे. खरिपाची तयारी म्हणून शेतकऱ्यांनी शेताचे सपाटीकरण केले आहे. मात्र, पाऊस येत असल्याने नांगरणी केलेल्या शेतात रण वाढणार आहे. त्यासाठी पुन्हा नांगरणीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. जमिनीची धूप झाली नसल्याने खरीप हंगामात पीक उतारा देईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. वादळामुळे विजेच्या तुटलेल्या तारा व खांबाची दुरस्ती सुरू असली तरी दर दिवसाआड येत असलेल्या वादळाने पुन्हा जैसे थे स्थिती होत आहे. शेतीकामात अडथळा येत आहे. पेरणीवेळी करावी लागणारी जांभूळवाही आताच करावी, का असा प्रश्न उभा ठाकत आहे. या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा अधिक होणार असल्याचे बोलले जात असल्याने या पिकाच्या पेरणीला अजून एक महिन्याचा वेळ आहे. अशात केलेली उन्हाळवाही येणाऱ्या पावसामुळे नेस्तनाबुत झाल्याने शेतकऱ्यांना दुबार खर्चाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस