शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

उड्डाणपूल बांधकामात अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:00 AM

बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाची जीर्ण अवस्था झाली होती. पुलावर हजारावर खड्ड्यांनी जाळे विणले होते. अरुंद पूल रहदारीकरिता अडचणीचाच ठरत होता. याच पुलावरून हिंगणघाट, आणि यवतमाळ, वर्ध्याकडे जाणाऱ्या वाहतुकीची सातत्याने वर्दळ असते. परिणामी, अरुंद पुलामुळे नेहमीच वाहतूक ठप्प पडत होती. वाहनधारकांना तासन्तास पुलावरच अडकून पडावे लागत होते.

ठळक मुद्देआधी लॉकडाऊन, आता रेल्वेने बदलविले डिझाईन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बजाज चौकातील उड्डाणपुलाच्या बांधकामात अगोदर कोरोना लॉकडाऊनने, तर आता रेल्वेने आपल्या हद्दीत पुलाचे डिझाईन बदलविल्याने खोडा निर्माण झाल्याचे चित्र आहे.बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाची जीर्ण अवस्था झाली होती. पुलावर हजारावर खड्ड्यांनी जाळे विणले होते. अरुंद पूल रहदारीकरिता अडचणीचाच ठरत होता. याच पुलावरून हिंगणघाट, आणि यवतमाळ, वर्ध्याकडे जाणाऱ्या वाहतुकीची सातत्याने वर्दळ असते. परिणामी, अरुंद पुलामुळे नेहमीच वाहतूक ठप्प पडत होती. वाहनधारकांना तासन्तास पुलावरच अडकून पडावे लागत होते. वेळोवेळी मागणीनंतर पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. २९ कोटी रुपयांचा निधी पूल बांधकामाकरिता मंजूर झाला. या पुलाचे दोन-तीन वर्षांपूर्वी बांधकाम सुरू झाले. काम गतीने सुरू असतानाच मार्च महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे काम बंद पडले. दरम्यानच्या काळात मजूरवर्गही स्वगावी गेल्याने काम आणखीच रेंगाळले.जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर शासनाने शसकीय आणि खासगी बांधकामांना परवानगी दिली. आचार्य विनोबा भावे यांच्या नावे ओळखल्या जाणारा हा उड्डाणपूल रेल्वे विभागाच्या अखत्यारित येतो.सद्यस्थितीत पुलाचे ३० ते ४० टक्के काम झाले आहे. आता मध्येच रेल्वेने उड्डाणपुलाचे डिझाईन बदलविण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या हद्दीत मध्यभागात उड्डाणपुलाचे डिझाईन बदलले आहे.त्यामुळे पुलाची इतर बारीकसारीक कामे उरकविली जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. रेल्वेने पुलाचे संपूर्ण डिझाईनच बदलल्यास कामाला आणखी विलंब लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्यातरी नागरिकांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागणार आहे.उड्डाणपुलावर मेगाब्लॉक नित्याचावर्धा शहराला जोडणारा आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, गत काही वर्षांपासून पुलाची दुर्दशा झालेली आहे. हिंगणघाट, यवतमाळकडे याच उड्डाणपुलावरून वाहतूक होते. उड्डाणपूल आधीच अरुंद त्यातच वाहनांच्या वाढत्या संख्येचा भार यामुळे उड्डाणपुलावर सातत्याने वाहतुककोंडी होत होती. यामुळेच पूल बांधकामाची मागणी झाली आणि कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा