शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी सुविधा प्रदान करा

By admin | Updated: June 17, 2016 02:31 IST

शेतीकरिता लागणारे बी-बियाणे, खत व कीटकनाशकांचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

अनियमित वीजपुरवठा : शेतकरी कामगार संघर्ष परिषदेची मागणीवर्धा : शेतीकरिता लागणारे बी-बियाणे, खत व कीटकनाशकांचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर शेतीसाहित्य यावे. तसेच नियमित वीज पुरवठा करण्यात यावा, तसेच या सुविधा पेरणीपूर्वी प्रदान करण्याची मागणी शेतकरी कामगार संघर्ष परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.विदर्भात ६ हजार मेगावॅट वीज तयार होते. विदर्भाकरिता २२०० मेगावॅट वीज येते. यात वाढ करुन ३ हजार मेगावॅटपर्यंत वीज देण्यात यावी. यामुळे शेतकऱ्यांना विजेचा तुटवडा भासणार नाही. भारनियमनाचा सामना करावा लागणार नाही याची शासनाने दखल घ्यायला पाहिजे.शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी १०० टक्के कर्जमाफी देण्यात यावी. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. सत्ता स्थापन करताना शेतकऱ्यांना दिलेले वचन अद्याप पाळले नाही. शेतकऱ्यांना केवळ आश्वास्न दिले. शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी दिल्याशिवाय शेतकरी आतमहत्येचा प्रश्न निकाली निघणे शक्य नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती व समाज कल्याण विभागामार्फत शेतकऱ्यांना ताडपत्री, पाईप, स्पे्रपंप, शेती साहित्य दिले जाते. शेतकऱ्यांना यापुढे याचा थेट लाभ मिळावा. शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. शेतात विहिरी व मोटारपंप देण्यात यावे. शेतकऱ्यांना सिंचनाकरिता निम्न वर्धा प्रकल्पाचे मिळायला हवे. प्रकल्पाचे पाणी मिळाल्यानंतर येथील शेतकरी वर्षातून दोनदा उत्पन्न घेऊ शकतो. यासह शेतमजुराला काम मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही. तसेच शेतमजुरावर उपासमारीची वेळ येणार नाही. याकरिता सत्ताधाऱ्यांनी तातडीने निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.यासह बँकेकेडे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात सवलत मिळावी. ज्या शेतकऱ्यांनी एक रकमी परतफेड योजनेत थकीत कर्जाचा भरणा केला आहे. अशा शेतकऱ्यांना खरीप सन २०१६ चे पीक कर्ज देण्याचे आदेश संबंधित बँकांना देण्यात यावे. ज्यामुळे या शेतकऱ्यांची जमीन पडीत राहणार नाही. जिल्हाधिकारी यांनी याबाबत सर्व बँकेला पत्र पाठवून शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या विविध मागणीचे शेतकरी कामगार संघर्ष परिषदेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर निघोट यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदन सादर करताना धनराज बालपांडे, ज्ञानेश्वर परबत, प्रेमदास शेंदरे, दिंगाबर झाडे, शोभा वानखेडे यासह पदाधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)