शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी नव्या कृषी रोजगार योजनेचा लोकसभेत प्रस्ताव

By admin | Updated: August 7, 2015 02:06 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसारखीच शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी रोजगार योजना सुरू करण्यात यावी, ...

वर्धा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसारखीच शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी रोजगार योजना सुरू करण्यात यावी, असा प्रस्तावच वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी बुधवारी लोकसभेपुढे शून्य काळात ठेवला. यावेळी विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथांकडेही लक्ष वेधले.महाराष्ट्रात निसर्गाच्या अनियमिततेमुळे दुष्काळ निर्माण होण्याची स्थिती आहे. मागील दहा वर्षांपासून अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट झालेला आहे. अशाही स्थितीत बियाणे, खत यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. मे-जून महिन्यात पेरणी केल्यानंतर जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना उत्पन्न निघण्याची वाट पहावी लागते, परंतु नैसर्गिक संकट आले तर, शेतकऱ्यांनी लावलेला खर्च निघणेसुद्धा कठिण जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले. शून्य प्रहरात खा. तडस यांनी हा प्रश्न उपस्थित करताना शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसारखीच कृषी रोजगार योजना अंमलात आणली, तर शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल, याकडे लक्ष वेधले. ही योजना केंद्र शासनाने राबविल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सोबतच उत्पन्नाचा लाभ मिळेल, परंतु अशी कोणतीही योजना नसल्यामुळे ४० टक्के शेतकरी घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही. फक्त शेतकऱ्यांचे २० टक्के पुनर्गठण झालेले आहे. ही कृषी रोजगार योजना सुरु केल्यास आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, ही बाबही खा. तडस यांनी पटवून दिली.(जिल्हा प्रतिनिधी)