शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पंतप्रधानांच्या योजनेचा गॅस सिलिंडरवरूनही प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:54 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्तारूढ झालेल्या भाजप सरकारने सरकारी योजनांच्या जाहिराती विविध माध्यमातून केल्या.

ठळक मुद्देयोजनेचे सिलिंडर दिल्याचा ग्राहकांना संशय

ऑनलाईन लोकमतवर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्तारूढ झालेल्या भाजप सरकारने सरकारी योजनांच्या जाहिराती विविध माध्यमातून केल्या. या जाहिराती आता गॅस सिलिंडरवरून करण्यात येत असल्याने महिलांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सिलिंडरवर पंतप्रधान उज्ज्वला योजनेची जाहिरात करणे सुरू केले आहे. त्यामुळे हे योजनेचे सवलतीचे सिलिंडर आपल्याला देण्यात आले असावे, असा संशय महिलांमध्ये निर्माण झाला आहे.महिलांची धुरापासून मुक्तता व्हावी या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला योजना देशभरात सुरू केली. ज्या कुटुंबाकडे गॅस सिलिंडर नाहीत. अशा कुटुंबाना नाममात्र शुल्कात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले. वर्धा जिल्ह्यात जवळजवळ ४० हजार कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळाला, अशी माहिती पुढे आली आहे. या योजनेचे फलक पेट्रोलपंपावर तसेच बसेसवर लावण्यात आले आहे. आता याच्या पुढे जावून सिलिंडरवरच या योजनेची जाहिरात सुरू करण्यात आली आहे.अनेक घरी वितरकाकडून योजनेची जाहिरात असलेले सिलिंडर देण्यात येत आहे. हे सिलिंडर सवलतीचे असावे किंवा योजनेचे सिलिंडर आपल्याला जास्त पैसे घेऊन दिले असावे, अशी संभ्रमाची भावना ग्राहकाच्या मनात निर्माण झाली आहे. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेत ही जाहिरात सिलिंडरवर करण्यात आली.