राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी यंत्रणा लागली कामाला; जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक 

By अभिनय खोपडे | Published: June 21, 2023 05:20 PM2023-06-21T17:20:39+5:302023-06-21T17:21:56+5:30

महामहिम राष्ट्रपती 6 जुलै रोजी वर्धा येथे येत असून येथे आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

President Draupadi Murmu visit to wardha on july 6th | राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी यंत्रणा लागली कामाला; जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक 

राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी यंत्रणा लागली कामाला; जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक 

googlenewsNext

वर्धा : देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांचा 6 जुलै रोजी वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रम आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व संबंधित विभागांकडून तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला.

बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवळे, उपजिल्हाधिकारी सोपान कासार, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी नितीन चौधरी, कार्यकारी अभियंता महेश माथुलकर, पोलिस निरिक्षक संजय गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महामहिम राष्ट्रपती 6 जुलै रोजी वर्धा येथे येत असून येथे आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने विविध बाबींचा विभागनिहाय आढावा घेतला.            

राष्ट्रपतींचा वर्धा शहरातील प्रवासाचा मार्ग, मार्गावरील सुरक्षा, हेलीपॅड निर्मिती, वाहतूक, स्टेज, निवास, स्वागत, वैद्यकीय पथक, सुरक्षा पासेस, राष्ट्रपतींच्या आगमनानिमित्त शहराची स्वच्छता, कार्यक्रमस्थळी इंटरनेट सुविधा, बैठक व्यवस्था आदींचे नियोजन विभागांकडून जाणून घेतले. राष्ट्रपतींचा जिल्ह्यातील दौरा सुयोग्य प्रकारे पार पडण्यासाठी विभागांनी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला महसूल, पोलिस, आरोग्य, परिवहन, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पुरवठा विभाग, वीज वितरण कंपनी, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, नगर पालिका प्रशासन, हिंदी विश्वविद्यालय आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: President Draupadi Murmu visit to wardha on july 6th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.