शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वीज सवलत अनुदान बंद; उद्योग आले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 05:00 IST

राज्य शासनाने उद्योगांना विशेष सवलत जाहीर करुन जवळपास दोन रुपयापर्यंत प्रति युनिट अनुदान मिळत होते. विदर्भ व मराठवाडा येथे जास्तीत जास्त उद्योजकांनी येऊन उद्योग उभारावे यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने ही वीज सवलत देण्यात आली होती.  यासाठी २०२०-२१ मध्ये शासनाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे अंदाजे १२०० कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करुन दिले होते; मात्र शासनाने २०२१-२२ करिता अनुदान उपलब्ध न केल्याने मे २०२१ पासून सवलत देणे बंद केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना राज्य शासनाने वीज देयकामध्ये विशेष सवलत जाहीर केली होती; मात्र ही वीज सवलत अनुदान मे महिन्यांपासून बंद झाल्याने विदर्भातील उद्योग अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे वीज सवलत अनुदान योजना तत्काळ सुरु करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव शेखर शेंडे व एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदनातून केली आहे.राज्य शासनाने उद्योगांना विशेष सवलत जाहीर करुन जवळपास दोन रुपयापर्यंत प्रति युनिट अनुदान मिळत होते. विदर्भ व मराठवाडा येथे जास्तीत जास्त उद्योजकांनी येऊन उद्योग उभारावे यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने ही वीज सवलत देण्यात आली होती. यासाठी २०२०-२१ मध्ये शासनाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे अंदाजे १२०० कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करुन दिले होते; मात्र शासनाने २०२१-२२ करिता अनुदान उपलब्ध न केल्याने मे २०२१ पासून सवलत देणे बंद केले आहे. कोरोना महामारीमुळे आधीच अनेक उद्योग आर्थिक संकटात सापडले आहे.त्यातच मिळणारे अनुदान उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर वीज वितरण कंपनीला अनुदान उपलब्ध करुन दिल्यास वीज बिलात सवलत मिळेल, उद्योगाला याचा फायदा होऊन स्पर्धेत टिकता येईल. असे निवेदनातून सांगितले. आधीच कोरोनामुळे अनेक उद्योजकांवर आर्थिक संकट उभे असून नैराश्यात आले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.चर्चेदरम्यान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत शासन स्तरावरुन लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन देत विदर्भातील उद्योजकांना न्याय मिळवून देणार असे आश्वासन शेखर शेंडे व प्रवीण हिवरे यांना दिले. 

 

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतelectricityवीज