शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

डाक कार्यालयातील सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

अल्लीपूरसह लगतच्या गावांतील ज्येष्ठ नागरिकांची खाती याच डाक कार्यालयात आहेत. ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी गेले असता लिंक फेलचा फलक मागील पंधरा दिवसांपासून झळकत आहे. त्यामुळे वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देपंधरवड्यापासून ‘नो कनेक्टिव्हिटी ’: नागरिकांच्या कामांचा खोळंबा

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : येथील डाक कार्यालयातील इंटरनेट सेवा कोलमडल्याने पंधरड्यापासून सेवा ठप्प झाली आहे. परिणामी, नागरिकांना आल्यापावलीच परतावे लागत आहे. .अल्लीपूरसह लगतच्या गावांतील ज्येष्ठ नागरिकांची खाती याच डाक कार्यालयात आहेत. ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी गेले असता लिंक फेलचा फलक मागील पंधरा दिवसांपासून झळकत आहे. त्यामुळे वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे.गावात भारत संचार निगम लिमिटेडच्या सेवेत सातत्याने तांत्रिक बिघाड निर्माण होतो. याचा परिणाम, विविध कार्यालयातील इंटरनेट सेवा नेहमीच प्रभावित होते. सुकन्या योजनेचे पैसे डाक कार्यालयात भरावे लागतात. नागरिक पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी याशिवाय किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी जातात. विविध प्रकारच्या कामासाठी कार्यालयात येणाऱ्या हजारो ग्राहकांना लिंक फेलमुळे आल्यापावली परतावे लागत आहे. वरिष्ठांनी उपाययोजना करून डाक कार्यालयातील कारभार सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.भारत संचार निगम लिमिटेची इंटरनेट सेवा बंद असल्याने डाक कार्यालयाच्या सेवेवर परिणाम झाला आहे. यामुळे ग्राहकांना त्रास होत आहे.- सुनील लोखंडे, पोस्ट मास्टर, अल्लीपूर.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस